Summer Tourism: उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी भारतातील हटके आणि स्वस्त ठिकाणे, घ्या जाणून

Best Places In India: उन्हाळ्याच्या काळात सहसा थंड हवेच्या ठिकाणांना भेटी दिल्या जातात. आपण आज उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी भारतातील काही हटके आणि स्वस्त ठिकाणं जाणुन घेऊ या.
Summer Tourism
Summer TourismYandex

Summer Tourism Best Places In India

आता काही दिवसांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपतील. त्यानंतर बऱ्याचजणांचा बाहेर फिरायला जायचा प्लॅन होतो. उन्हाळ्याच्या काळामध्ये सहसा थंड हवेच्या ठिकाणांना भेटी दिल्या (Summer Tourism) जातात. आपण आज उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी भारतातील काही हटके आणि स्वस्त ठिकाणं जाणुन घेऊ या. अगदी माफक खर्चात तुम्ही या उन्हाळ्यात पर्यटनाचा आनंद घेऊ (summer vacation) शकता.  (Latest Weather Update)

माऊंट अबू (राजस्थान)

राजस्थानमधील माऊंट अबू हे ठिकाण खास उन्हाळ्यात पर्यटनासाठी अतिशय खास आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी नक्की जा. हे ठिकाण जास्त दूर नाही. अरवली पर्वतातले माऊंट (Summer Tourism Best Places) अबू सुप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. त्यामुळे उन्हाळ्यात इथे अजिबात उष्णतेचा त्रास होत नाही. राजस्तानमधील इतर ठिकाणांपेक्षा माऊंट अबू हे स्वस्त ठिकाण आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिलॉंग (मेघालय)

उन्हाळ्यात फिरण्यासाठी शिलॉंग हे बेस्ट ठिकाण आहे. हे ठिकाणास स्कॉटलॅंड ऑफ द ईस्ट नावानेदेखील ओळखले जाते. येथे दरवर्षी विदेशातून लाखो पर्यटक हजेरी लावत (Tourism Places In India) असतात. जंगलातून पायी फिरणे, ट्रॅकिंग, वेगवेगळ्या रोमांचक अॅक्टिविटींसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे ठिकाण थोडं अडवळणी आहे. परंतु पर्यटन तुलनेत स्वस्त आहे.

कुर्ग (कर्नाटक)

कुर्ग हे कर्नाटकातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कुर्ग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी 6 हजार रुपयांमध्ये 3 दिवसांची सोय करणारी उत्तम हॉटेल्स (Tourist) आहेत. कुर्गच्या आसपास अब्बे फॉल, नल्कनाद पॅलेस, बेरा फॉल रिव्हर, ब्रह्मागिरी पीक, इरुप्पु फॉल, नामद्रोलिंग मोनेस्टरी आणि कावेरी रिव्हर सारखे सुंदर ठिकाणं आहेत.

Summer Tourism
Satara Tourism: मुनावळे येथे महिन्याभरात सुरु होणार वॉटर स्पोर्टस, सातारा पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटीची मान्यता

रानीखेत (उत्तराखंड)

उत्तराखंडमधील रानीखेत हे ठिकाण येथील शांततेसाठी प्रसिद्ध आहे. हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन (Best Places In India) आहे. अनेकदा या ठिकाणी चित्रपटांच्या शुटींग देखील होत असतात. कुमांऊच्या पर्वतांमध्ये करण्यात येणारे पॅराग्लाइडिंग हे या ठिकाणीची वेगळी ओळख आहे. हे ठिकाण देखील पर्यटनासाठी बेस्ट आणि बजेटमध्ये बसणारे आहे.

Summer Tourism
Karjat Tourist Place : गुलाबी थंडीचा मनसोक्त आनंद लुटायचाय? कर्जतजवळील या पर्यटनस्थळांना भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com