Lamayuru - The Moonland of Ladakh Saam Tv
लाईफस्टाईल

Moonland of India in Ladakh: लेह लडाखमधील मूनलँड माहितीये का? चंद्रासारखे असणाऱ्या या ठिकाणाला नक्की भेट द्या

Lamayuru Ladakh's Moonland: अनेक पर्यटकांचे लेह-लडाखला जाण्याचे स्वप्न असते. लेह लडाखमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही फिरु शकतात. लेह लडाखमध्ये एक असे ठिकाण आहे जिथे आल्यावर तुम्हाला चंद्रावर आल्यासारखे वाटते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या जागेल मूनलँड असेही म्हटले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India's Moonland in Ladakh

अनेक पर्यटकांचे लेह-लडाखला जाण्याचे स्वप्न असते. साहसी पर्यटकांना एकदा तरी लेह- लडाखला जायला आवडेल. लेह- लडाखमध्ये फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. लेह- लडाखमध्ये एक ठिकाण आहे त्याला लडाखचा मूनलँड असेही म्हणतात.

लेह आणि कारगीलच्या मध्ये एक लहान गाव आहे. ज्याला मूनलँड असे म्हणतात. लेहपासून जवळपास १२० किमी अंतरावर लामायुरू गाव आहे. या गावाला मूनलँड म्हणून ओळखले जाते. याबाबत शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, या गावात जास्त प्रमाणात झाडे झुडपे नाहीत. तसेच जास्त हवादेखील नाही. त्यामुळे त्या गावाला मूनलँड म्हणतात. या गावात कोणत्याही प्रकारची झाडे नसल्याने तिथे निसर्गरम्य वातावरण नसते. परंतु हे गाव एकदम चंद्रासारखे दिसते.

या गावात जवळपास ४० वर्षांपूर्वी एक तलाव होता. काही वर्षांनी या तलावातील पाणी निघून गेले. त्यानंतर येथे मठ बांधण्यात आला. हा लेह- लडाखमधील एक प्रसिद्ध मठ आहे. येथे शास्त्रज्ञ चंद्र आणि मंगळ यांसारख्या ग्रहांच्या संशोधनासाठी येतात.

या मठाला भेट देण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक लेह लडाखला येतात. येथील वातावरण खूप जास्त चांगले आहे. येथील वातावरण हे चंद्रासारखे असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. येथे जाण्यासाठी लेह आणि कारगिल या ठिकाणांहून सकाळी १० ते १२ वाजताच्या सुमारास बस आहेत. या बसमधून तुम्ही मठापर्यंत पोहचू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT