ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष असे महत्त्व आहे. तसेच ग्रहांचे संक्रमण विशिष्ट वेळेनुसार होत असते. १५ मार्चला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल.
मंगळ हा ग्रह स्वभावाने अतिशय आक्रमक मानला जातो. तर दुसरीकडे त्याला धैर्य आणि शौर्य ग्रह देखील मानले जाते. ज्या वेळी मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा शुक्राशी संयोग होईल. शुक्र हा बलवान ग्रह मानला जातो. ग्रहांच्या युतीमुळे ५ राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. लोकांना करिअर (Career) आणि बिझनेसमध्ये (Business) फायदा होईल. तसेच यशही मिळेल. कोणत्या ५ राशींना फायदा (Benefits) होणार आहे जाणून घ्या.
1. मेष
मेष राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणामुळे करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. निर्णय घेताना नशीब तुमच्या बाजूने असेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. अपेक्षित यश मिळेल. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील.
2. सिंह
युतीमुळे करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. नात्यात काळजी घ्यावी लागेल.
3. कन्या
व्यावसायिक जीवनात पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. पार्टनरसोबत समन्वय साधाल. करिअरमध्ये अपेक्षित प्रगती झाल्यामुळे कुटुंबात आनंद राहिल. आरोग्यपूर्वीपेक्षा चांगले राहिल.
4. धनु
व्यवसायात चांगला नफा मिळेल. आर्थिक बाबतीत हे संक्रमण अनुकूल परिणाम देईल. अचनाक पैसे कोणत्यातरी गोष्टीत अडकतील. आयुष्यात प्रगती कराल. करिअरमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे कमवाण्याच्या संधी मिळतील.
5. कुंभ
हे संक्रमण कुंभ राशीच्या आयुष्यात मोठी प्रगती आणणारे असेल. करिअरमध्ये झपाट्याने प्रगती कराल. आर्थिक बाबींमध्ये लाभाची शक्यता आहे. आत्माविश्वास वाढेल. आरोग्य सुधारेल.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.