Salt Side Effects Saam TV
लाईफस्टाईल

Health Tips : सावधान! तुम्हालाही आळणी जेवण आवडत नाही; वाचा जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम

Salty Food Side Effects : पदार्थाची चव वाढवणारे मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचे आरोग्य मात्र धोक्यात येऊ शकते. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन करणे शरीराच्या अनेक आजारांना आमंत्रण देते.

Ruchika Jadhav

आपल्या रोजच्या जीवनात मीठ खूप महत्त्वाचे आहे. मीठाशिवाय अळणी जेवण खायला कुणालाच आवडत नाही. तसचे मीठाशिवाय अन्नालाही चव येत नाही. त्यामुळे जेवणात मीठाचा सहभाग असणे गरजेचे आहे. पण हेच पदार्थाची चव वाढवणारे मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचे आरोग्य मात्र धोक्यात येऊ शकते. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन करणे शरीराच्या अनेक आजारांना आमंत्रण देते.

मोठ्या प्रमाणात मीठ खाल्ल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयासंबंधित आजार बळवतात. तसेच किडनीचे आरोग्यदेखील धोक्यात येते. जेवणात मीठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला नेहमी देत असतात. स्वयंपाक करताना मीठ कमी वापरा आणि अन्नात अतिरिक्त मीठ घालणे टाळा. जेणेकरुन तुमचे आरोग्य तंदुरुस्त राहील.

अतिप्रमाणात मीठ खाल्ल्यास तुम्हाला आरोग्याच्या 'या' समस्यांना सामोरे जावे लागेल-

उच्च रक्तदाबाची समस्या

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. परिणामी रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये दाब वाढतो आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते.

हृदयाची समस्या

शरीरातील मीठाचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात मोठाचे सेवन केल्यास 'कोरोनरी धमनी' रोग हा हृदयासंबंधित आजार होतो.

स्ट्रोकचा धोका

उच्च रक्तदाब आणि हृदयविकारामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. मिठाचे जास्त सेवन मेंदूच्या रक्तवाहिन्यांना देखील नुकसान पोहचावते.

किडनीची समस्या

नियमित जास्त मीठाचे सेवन केल्यास मूत्रपिंडाच्या कार्यावर अतिरिक्त दबाव येतो. यामुळे मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते आणि 'क्रोनिक किडनी'चा त्रास उद्भवतो.

ऑस्टियोपोरोसिसचा धोका

मिठाच्या अतिसेवनामुळे हाडांमधून कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे ऑस्टियोपोरोसिससोबत हाडांच्या अनेक आजारांचा धोका वाढतो.

मधुमेह

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी आपल्या जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करावे किंवा मीठ कमी खावे. कारण जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास मधुमेहाची पातळी वाढू लागते.

डोकेदुखी

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास डिहायड्रेशन होते. त्यामुळे वारंवार डोकेदुखी होऊ लागते. अतिरिक्त मिठामुळे मायग्रेनची समस्या देखील उद्भवते.

लठ्ठपणा

जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्यास शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते, परिणामी शरीरातील चरबी वाढू लागते आणि लवकर लठ्ठपणा येतो.

वारंवार तहान लागणे

मीठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याचे अतिरिक्त सेवन केल्यास शरीराचे संतुलन बिघडते आणि वारंवार तहान लागते.

त्वचा आणि केसांचे आरोग्य धोक्यात

जास्त मीठ खाल्ल्यामुळे त्वचेवर वारंवार खाज येते, त्वचेची जळजळ होते आणि त्वचेवर पुरळही येते. शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढल्यामुळे केस गळतीची समस्या देखील उद्भवते. आजपासूनच अतिरिक्त मीठ खाणे टाळा, नाहीतर आरोग्याचे गणित बिघडेल.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT