Stress Management Saam Tv
लाईफस्टाईल

तुम्हालाही कामातून Break घेण्याची गरज आहे? कसे कळेल? या गोष्टी लक्षात ठेवा

Stress Management : प्रत्येकजण स्वत:च्या कामात इतका गुरफटून गेलाय की, त्याला स्वत:कडे लक्ष देता येत नाही. आयुष्यात काम, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांखाली दबून राहिल्यामुळे आपल्याला स्वत:बदल विचार करायला मिळत नाही.

कोमल दामुद्रे

Self Time :

प्रत्येकजण स्वत:च्या कामात इतका गुरफटून गेलाय की, त्याला स्वत:कडे लक्ष देता येत नाही. आयुष्यात काम, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांखाली दबून राहिल्यामुळे आपल्याला स्वत:बदल विचार करायला मिळत नाही.

असे अनेक लोक आहे ज्यांना स्वत:साठी एक दिवसही वेळ नसतो. अशावेळी हळूहळू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यक्ती आजारी पडू लागते. आज आम्ही तुम्हाला काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला कामातून आणि जबाबदारीतून काही काळ विश्रांती घेणे गरजेचे आहे.

1. फोकस करण्यात अडचण

कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि मन एकाग्र करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही काही काळ विश्रांती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे मन शांत राहिल. तसेच स्वत: कडे लक्ष केंद्रित करता येईल.

2. शरीरात ऊर्जेची कमतरता

आपल्याला अस्वस्थ वाटू लागले की, चहा किंवा कॉफीचा पर्याय आपण निवडतो. परंतु, दिवसभरातील कामे करताना सतत आळसपणा येतो. त्यावेळी तुम्ही शारीरिक नाही तर भावनिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले आहात. तसेच दररोज नवीन आव्हाने घेण्याची तुमची ही सवय तुम्हाला आतून थकवत असते. त्यासाठी काही वेळेसाठी कामातून ब्रेक घेणे गरजेचे आहे.

3. लहानसहान गोष्टींवरुन चिडणे

जर तुम्हाला प्रत्येक छोट्या गोष्टींवरुन राग येत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुम्हाला ब्रेकची (Break) नितांत गरज आहे असे समजावे. यासाठी तुम्ही काही वेळेस लोकांपासून अंतर ठेवा. स्वत:सोबत वेळ घालवा. रागावर नियंत्रण कसे ठेवता येईल याची काळजी (Care) घ्या

4. भावनिक होणे

भावनिकदृष्ट्या व्यक्ती थकलेली असेल तर ती, स्वत:च्या भावनांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करु शकत नाही. अगदी छोटी गोष्ट देखील अस्वस्थ करु शकते. ज्यामुळे तुम्हाला लगेच रडू कोसळते. अशावेळी रडण्याऐवजी मित्रांशी बोला.

5. प्रेरणा

स्वप्न पूर्ण करताना आपण वेळेचे (Time) भान राखत नाही. परंतु, अशी वेळ येते की, जेव्हा काम करताना कोणतीही प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे कामाची इच्छा होत नाही. जर तुमच्या काम करण्याची प्रेरणा नसेल तर तुम्हाला स्वत:ला पूर्वीसारखे करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?

Breakfast Recipe: पौष्टिक आणि चवदार, ऑफिसला जाण्यापूर्वी नवऱ्यासाठी बनवा हे 4 नाश्ता प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Whatsapp: व्हॉट्सॲपच्या ३ अब्ज युजर्सवर मोठं संकट, नव्या टूलने वाढवलं टेन्शन; तुमच्या मोबाइलवर ठेवतंय लक्ष

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

SCROLL FOR NEXT