Mental Stress : मानसिक त्रासामुळे सतत चीडचीड होते? डोक्यात नकारात्मक विचार येतात, या टिप्स फॉलो करा

How To Stop Negative Thoughts : सतत डोक्यात येणाऱ्या नकारात्मक विचारांना कसे थांबवायचे हे जाणून घेऊया.
Mental Stress
Mental StressSaam Tv
Published On

Mental Stress Reason :

जगभरातील ९० टक्के लोक सध्या मानसिक तणावच्या विळख्यात सापडले आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत बरेचदा आपल्याला ताण-तणांवाचा सामना करावा लागतो.

ऑफिसचे काम, सतत चिडचिड होणे, जबाबदाऱ्या, आजारपण, झोपेची कमतरता यामुळे आपल्या मनावर अधिक ताण येतो. सातत्याने ताण-तणावात राहिल्याने शरीर आणि मनासाठी अधिक घातक असते. परंतु, सध्याच्या जीवनशैलीत चिंता आणि तणावाचा सामना करणे हे अनेकांना सामान्य वाटते. प्रत्येक वयोगटातील लोक हे हल्ली मानसिक तणावाचा शिकार झाले आहे. सतत डोक्यात येणाऱ्या नकारात्मक विचारांना कसे थांबवायचे हे जाणून घेऊया.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ताण म्हणजे काय?

तणाव (Stress) हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. या नकारात्मक विचाराने आपल्या मनावर अधिराज्य गाजवल्यास आपल्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे मेंदू नीट काम करत नाही. सतत आपली चिडचिड होते. त्यामुळे या परिस्थितीवर सहज मात करता येत नाही.

Mental Stress
Low Blood Pressure : अचानक शरीरातील ब्लड शुगर कमी झालं? लो बीपीचा त्रास नाही ना, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष नकोच!

2. तणावाची लक्षणे

डोकेदुखी (Headache), नकारात्मक विचार येणे, काम करण्यात रस नसणे, झोप न येणे, भूक न लागणे, स्वत:वर विश्वास नसणे, सतत चिडचिड होणे

3. तणावापासून स्वत:ला दूर कसे ठेवाल?

1. पुरेशी झोप घ्या

रात्री ७ ते ८ तास पुरेशी झोप (Sleep) घ्या. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर थकवा जाणवतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

Mental Stress
Yoga For Diabetics : मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 5 योगासने करावीत, रक्तातील साखर नियंत्रीत राहील

2. मेडिटेशन करा

ध्यान, योग आणि व्यायाम करा. आपल्या रोजच्या जीवनशैलीत या गोष्टींचा समावेश केल्यास फायदा होईल.

3. आहार

ताण-तणाव आल्यास मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी आहारात बदल करणे गरजेचे आहे. जंक फूड खाऊ नका. हिरव्या भाज्या किंवा फळांचा आहारात समावेश करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com