What are the signs of stress in a child: हल्ली स्ट्रेस घेण्याची समस्या लहानांपासून मोठयापर्यंत अधिक प्रमाणात आढळून येत आहे. तणावाचा शिकार झाल्यानंतर आपले मानसिक संतुलन विस्कळीत होते. अनेक वेळा मुल तणावाखाली असल्यामुळे पालकांना त्यांना नीट व व्यवस्थितपणे सांगता येत नाही.
बालवयात मुलांचे मन हे नाजूक व अतिसंवेदनशील असते. ज्यामुळे त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. परीक्षेचे टेन्शन, इतर मुलांशी तुलना यामुळे मुल तणावाखाली येतात. मुलांच्या आजूबाजूच्या वातवरणाचा त्यांच्यावर नकारात्मक परिणम होतो. जाणून घेऊया मुलांना तणाव आल्यानंतर तो ओळखायचा कसा
1. वाईट स्वप्न
अनेकदा मुलांना (Child) झोपेत वाईट स्वप्न पडतात अशावेळी ते दचकूण जागे होतात. अशावेळी ते अधिक आक्रमक होतात. झोपेत ओरडतात किंवा रडू लागतात. पालकांनी यावेळी शांतपणे गोष्टी हाताळायला हव्या.
2. अभ्यासात लक्ष न लागणे
जेव्हा मुल तणावाखाली असते तेव्हा त्यांचे अभ्यासात (Study) आणि इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष केंद्रित करत नाही. त्यांना एकटे राहाण्यास अधिक जास्त आवडते.
3. आक्रमक होणे
मुलं तणावाखाली (stress) गेल्यानंतर ते अधिक आक्रमक होतात. अशावेळी ते जोरजोरात ओरडतात. अशावेळी त्यांना फटकारण्याऐवजी त्यांना कशामुळे त्रास होतो हे विचारा.
4. नातेवाईक व मित्रांना न भेटणे
अनेकवेळा जेव्हा मूल तणावाखाली असते तेव्हा तो नातेवाईक किंवा त्याच्या मित्रांना भेटणे टाळतात. तणावग्रस्त मूल अनेकदा एकटे राहण्याचा विचार करते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.