
Headache Problem : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोकांना अनेक प्रकारच्या तणावाचा सामना करावा लागतो. अधिक ताण घेतल्यामुळे डोकेदुखीची समस्या ही सामान्य वाटते. ताप, सर्दी किंवा सतत उन्हात राहिल्याने या तणावामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो.
अनेक वेळा हा त्रास खूप वाढतो. म्हणूनच या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. विशेषत: डोक्याच्या डाव्या बाजूला दुखत असेल तर हा आजार (Disease) होऊ शकतो, चुकूनही या लक्षणांकडे (Symptoms) दुर्लक्ष करू नका.
1. असह्य डोकेदुखी
आपले जरा डोके दुखू (Pain) लागले की, आपण पेनकिलर घेतो. परंतु, कितीही पेनकिलर खाल्ले तरी डोकेदुखी काही थांबत नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोक्याच्या डाव्या बाजूला दुखण्यासाठी औषध घेणे चांगले नाही. ही ब्रेन ट्यूमर, क्लस्टर, संसर्ग आणि मायग्रेनची प्रारंभिक चिन्हे असू शकतात. डोक्याच्या डाव्या बाजूला सतत दुखत असेल तर लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. जेणेकरुन आजाराचे लवकर निदान करता येते.
2. कसे ओळखाल ?
डोके सतत दुखत असेल तर डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्या. सीटी स्कॅन आणि एमआरआय स्कॅनद्वारे आपल्याला आजार ओळखता येईल. जर या आजाराचे वेळेवर निदान नाही झाले तर शरीराला अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी शरीरातील कोणत्याही असह्य वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.
3. डोक्याच्या डाव्या बाजूला वेदना होत असतील तर
A. मायग्रेन
मायग्रेनमध्ये अनेक वेळा डोकेदुखीची तीव्रपणात वाढते. यात चक्कर येणे सुरू होते, मळमळ, उलट्या यासारख्या समस्याही सुरू होतात.
B. क्लस्टर डोकेदुखी
यामध्ये डोळ्यांत पाणी येणे आणि घाम येणे, नाक वाहणे ही या आजारांची लक्षणे आहेत.
C. सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी
यामध्ये आळस, उदासपणा यासोबतच डाव्या बाजूला डोकेदुखी होते आणि मानदुखी, पाठदुखी सुरू होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.