Headache Problem : बदलत्या ऋतूमानानुसार तुम्हालाही मायग्रेनचा त्रास होतोय? मग 'हे' करुन पाहा

Migraine Symptoms : वातावरणातील बदलामुळे लोकांचे आरोग्य बिघडते ही एक सामान्य समस्या झाली आहे.
Headache Problem
Headache ProblemSaam Tv
Published On

Symptoms Of Migraine : वातावरणातील बदलामुळे लोकांचे आरोग्य बिघडते ही एक सामान्य समस्या झाली आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे काही लोकांना मायग्रेनचा त्रास होतो.

हवामानात (Weather) होणारे बदल जसे की तापमान, आद्रता, बॅरोमेट्रिक प्रेशर आणि हवामानातील इतर घटक यामुळे काही लोकांना तीव्र डोकेदुखी (Headache) सुरू होते. तथापी हवामानाशी संबंधित मायग्रेनच्या मागील ठोस कारण अभ्यासकांना आढळून आले नाही.

Headache Problem
Headache Home remedies : तुमचे देखील वारंवार डोके दुखते ? 'हे' काही घरगुती उपाय करून पाहा

काही अभ्यास सहकार्य असे सुचवले की बारा मॅट्रिक प्रेशर आणि तापमानातील बदलामुळे मेंदूतील रक्तप्रवाहात बदल होऊन मायग्रेनच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच इतर अभ्यासकांनी असे सांगितले आहे की सेरोटोनीन आणि डोपामाइन सारख्या विशिष्ट न्यूरोट्रान्समीटरच्या पातळीतील बदलांचा समावेश असू शकतो. हंगामी मायग्रेन टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे काही टिप्स सांगणार आहोत.

स्ट्रेस मॅनेजमेंट -

मायग्रेन वाढवणारा सामान्य घटक तणाव आहे. म्हणून तणाव दूर करण्यासाठी तुम्ही योग, मेडिटेशन किंवा दीर्घ श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करून तणाव मॅनेज करू शकता. नियमित मेडिटेशन केल्याने तणाव कमी होण्यास मदत मिळते.

Headache Problem
Headache : डोके दुखी वाढलीये ? तुमच्या डोक्यात पाणी तर साठले नाही ना, वेळीच लक्ष द्या

हायड्रेटेड राहणे गरजेचे -

शरीर हायड्रेट राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. अन्यथा डीहायड्रेशनमुळे मायग्रेन होण्याची शक्यता असते.

नियमित झोप घ्या -

झोपेच्या पद्धतीमध्ये हवामानातील बदल व्यत्यय आणू शकते. त्यामुळे मायग्रेन होण्याचा धोका वाढतो. मायग्रेन टाळण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. त्यासोबतच पुरेशी झोप झाल्याने आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.

मायग्रेनची नोंद ठेवा -

जेव्हा तुम्हाला मायग्रेनच्या समस्या उद्भवतात तेव्हा हवामानातील स्थितीकडे लक्ष द्या. याने तुम्हाला ट्रिगर ओळखण्यास मदत मिळते.

सनग्लासेसचा वापर करा -

तेजस्वी सूर्यप्रकाशामुळे काही लोकांना मायक्रोनचा त्रास होऊ शकतो. तेजस्वी सूर्यप्रकाशचा डोळ्यांवर थेट परिणाम होतो त्यामुळे ही जोखीम कमी करण्यासाठी सनग्लासेस घालने गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com