Tea Benefits For Headache : तुम्ही देखील डोके दुखीमुळे त्रस्त आहात ? फक्त 'या' 5 चहाचे सेवन करा, मिनिटांत व्हाल फ्रेश

घरी, कामाच्या ठिकाणी किंवा चहा पिण्याची इच्छा झाल्यानंतर आपण चहाचा आस्वाद हमखास घेतो.
Tea Benefits For Headache
Tea Benefits For HeadacheSaam Tv
Published On

Tea Benefits For Headache : चहा म्हटलं की, असंख्य चहाप्रेमी जागे होतात. आपल्या दिवसाची सुरुवातही चहानेच होते. दिवसभरात आपण असंख्य वेळा चहा पितो. घरी, कामाच्या ठिकाणी किंवा चहा पिण्याची इच्छा झाल्यानंतर आपण चहाचा आस्वाद हमखास घेतो.

प्रचंड काम किंवा झोप न झाल्यामुळे आपले डोके सतत दुखू लागते अशावेळी काय करावे सुचत नाही. वाढलेली डोके दुखी थांबवण्यासाठी एक कप गरम चहा तुमच्या वेदना कमी करतो आणि तुम्हाला पुन्हा रिफ्रेश करतो. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही हर्बल टीबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्‍यामध्‍ये नवीन ऊर्जा निर्माण करतील

Tea Benefits For Headache
Blue Tea : तुम्ही कधी निळ्या चहाचे सेवन केले आहे का ? चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर

1. आल्याचा चहा- भारतातील सर्वात प्रसिद्ध चहाचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदे आहेत. आल्यामध्ये असलेले प्रभावी अँटिऑक्सिडंट जळजळ कमी करण्यास मदत करतात.

2. कॅमोमाइल चहा- निद्रानाश आणि चिंता या दोन आजारांवर या चहाने सहज उपचार करता येतात. डोकेदुखीपासून (Headache) मुक्त होण्याची याची चिन्हे नसली तरी चिंतेमुळे होणारी डोकेदुखी दूर होते.

3. फीवरफ्यू चहा- हजारो वर्षांपूर्वी Feverfew चा वापर औषध म्हणून केला जात होता. मायग्रेनच्या उपचारासाठी फिव्हरफ्यूचा वापर अनेक अभ्यासांमध्ये प्रभावी सिद्ध झाला आहे. यामुळे मायग्रेन तसेच सामान्य डोकेदुखीमध्ये हे फायदेशीर आहे.

4. लवंग चहा- डोकेदुखीसह अनेक प्रकारच्या वेदना कमी करण्यासाठी शतकानुशतके लवंगचा वापर केला जातो. याचे अँटीनोसायसेप्टिव्स यासाठी जबाबदार आहेत. ते वेदना कमी करतात.

5. पेपरमिंट टी- मूळतः मध्य पूर्व आणि युरोपमध्ये आढळणारे पेपरमिंट आता जगभरात घेतले जाते. भारतात, अपचन, सर्दी, खोकला आणि इतर अनेक रोग बरे करण्यासाठी याचा वापर केला जातो ज्यामध्ये पेपरमिंट औषधी वनस्पती म्हणून वापरला जातो. या चवीचा चहा गरम पाण्यात पेपरमिंट टाकून बनवला जातो. यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com