Tikhat Shevaya Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Tikhat Shevaya Recipe: नाश्त्याला झटपट बनवा तिखट शेवया; वाचा ५ मिनिटांत तयार होणारी सिंपल रेसिपी

Ruchika Jadhav

लहान मुलांना पौष्टिक जेवण द्यावं असं प्रत्येक डॉक्टर सांगतात. मात्र लहान मुलांना पालेभाज्या आणि घरच्या जेवणापेक्षा बाहेरचा पिझ्झा, नूडल्स, मॅगी असं सर्व खायला आवडतं. आता तुमची मुलं सुद्धा असे पदार्थ खात असतील तर नाश्त्याला सकाळी त्यांना काय द्यावं असा प्रश्न अनेक महिलांसमोर उभा राहतो. त्यामुळे अशाच महिलांसाठी आम्ही देसी न्यूडल्स म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या तिखट शेवयांची रेसिपी आणली आहे.

आजवर तुम्ही गोड शेवया खाल्ल्या असतील. मात्र काहींना गोड आवडत नाही. त्या व्यक्ती शेवया तिखट पद्धतीने सुद्धा बनवू शकता. तिखट शेवया लहान मुलं नूडल्स समजून सुद्धा खातील. तसेच त्यांच्या आहाराच सर्व पौष्टिक भाज्यांचा सुद्धा समावेश होईल.

साहित्य

गव्हाच्या शेवाय किंवा मैद्याच्या शेवया

तेल

जिरे

मोहरी

लसूण

शेंगदाणे

टोमॅटो

मिरची

कांदा

मटार

मक्याचे कनीस

कोथिंबीर

कृती

सुरुवातीला एका भांड्यात तेल घ्या. तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कडीपत्ताचा तडका द्या. त्यानंतर यामध्ये शेंगदाणे टाकून घ्या तसेच लसूण ठेचून मिक्स करा. नंतर त्यात कांदा, टोमॅटो, मिरची, मटार हे सर्व मिक्स करा. भाज्या परतल्यावर त्यात मक्याचे कनसातील दाणे मिक्स करा. त्यानंतर चवीनुसार यात तिखट, मिठ आणि पाणी टाकून सर्व भाज्या छान शिजवू घ्या.

भाज्या छान शिजल्यानंतर यामध्ये शेवया देखील मिक्स करा. भाज्या छान शिजल्यावर त्यात शेवया टाकून त्या शिजवा. शेवया गव्हाच्या असतील तर त्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे अगदी ५ मिनिटे हे सर्व मिश्रण गॅसवर ठेवा. पाणी सर्व सुकल्यानंतर शेवया कोरड्या होउद्या. तयार झाल्या तुमच्या तिखट शेवया. या शेवया खाताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाका.

तिखट शेवयांमध्ये तुम्ही विविध भाज्या सुद्धा मिक्स करता. भाज्या मिक्स केल्यामुळे लहान मुलांना चांगले प्रोटीन मिळते. लहान मुलं पाले भाज्या किंवा अन्य फळ भाज्या,कडधान्ये खात नाहीत. त्यामुळे तुम्ही या शेवयांमध्ये विविध भाज्या आणि कडधान्य शिजवून ते मिक्स करून सुद्धा मुलांना खाण्यासाठी देऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

SCROLL FOR NEXT