Aloo Paratha Recipe: तुम्हाला पण आलू पराठा बनवता येत नाही; मग वाचा 'ही' सिंपल रेसिपी

Aloo Paratha Recipe In Marathi: नवीन रेसिपी शिकणाऱ्या महिलांना साध्या चपात्या बनवता येतात. मात्र त्यांना पराठे बनवणे कठीण वाटतं. त्यामुळे आम्ही आज सिंपल पराठ्याची रेसिपी सांगणार आहोत.
Aloo Paratha Recipe In Marathi
Aloo Paratha Recipe Saam TV

बटाटा अशी भाजी जी कोणत्याही अन्य भाजीबरोबर मिक्स होते. व्हेजसह नॉनव्हेजच्या भाजीमध्ये देखील भाजी कमी पडत असल्यास त्यात बटाटे टाकून ती वाढवली जाते. नवीन रेसिपी शिकणाऱ्या महिलांना साध्या चपात्या बनवता येतात. मात्र त्यांना पराठे बनवणे कठीण वाटतं. त्यामुळे आम्ही आज सिंपल पराठ्याची रेसिपी सांगणार आहोत.

Aloo Paratha Recipe In Marathi
Chilli Garlic Paratha: चमचमीत पदार्थांची चव चाखायची आहे? ट्राय करा चिली गार्लिक पराठा, रेसिपी पाहा

साहित्य

 • बटाटा

 • कांदा

 • मिरची

 • कोथिंबीर

 • जिरे

 • मोहरी

 • हिंग

 • गव्हाचं पीठ

 • मीठ

 • पाणी

 • तेल किंवा तूप

सुरुवातीला तुम्हाला पराठे बनवण्यासाठी बटाटे शिजवून घ्यावे लागतील. त्यासाठी बटाटे शक्यतो कुकरमध्येच शिजवून घ्या. कुकरला शिजवलेला बटाटा छान मऊ कुसकरता येतो. त्यानंतर एका कढईत तेल घ्या. त्यात जिरे, मोहरी आणि कडिपत्ता यांची फोडणी द्या. पुढे हळद, मीठ, मिरची आणि कांदा छान यात परतून घ्या. त्यानंतर यामध्ये शिजलेला बटाटा मिक्स करा.

बटाटा यात मिक्स करून झाल्यावर मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर गव्हाच्या पिठाची छान कनीक मळून घ्या. या पिठात पुढे सर्व भाजी मिक्स करून घ्या. त्यानंतर पिठाचे चपातीसारखे छान पारठे बनवा. तयार पराठे गॅसवर शॅलो फ्राय करा. पराठे भाजताना तुम्ही तेल किंवा तूप या पैकी काहीही एक वापरू शकता.

बटाट्यापासून बनवलेला हा पराठा तुम्ही दही किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. लहान मुलांना सुद्धा हा पराठा फार आवडेल. मुलांच्या आवडीनुसार तुम्ही यात तिखट आणि मिठ मिक्स केले पाहिजे. पराठा नाश्त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही घरी ही रेसिपी नक्की ट्राय करावी. आलू पराठा ऐवजी तुम्ही अन्य भाज्यांपासून देखील पराठा बनवू शकता.

काहीवेळा घरी रात्री बटाट्याची भाजी बनवली जाते. जेवण जास्त झाल्याने भाजी आपल्याला संपत नाही. रात्रीची उरलेली भाजी थोडी असते. त्यामुळे काही व्यक्ती ही भाजी फेकून देखील देतात किंवा भाजी तशीच गरम करून खातात. मात्र हिच भाजी थोडी आणखी मस्त बनवण्यासाठी यात पिठ मिक्स करून तुम्ही छान पराठे बनवू शकता.

Aloo Paratha Recipe In Marathi
Poha Paratha Recipe: नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा पोहे पराठा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com