Siddhi Hande
पावसाळ्यात सर्वांना चटकदार पदार्थ खायला आवडतात.
पावसाळ्यात तुम्ही चविष्ट बटाटा वडा बनवू शकतात.
बटाटा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या.
त्यांनतर मिक्सर भांड्यात मिरची, आलं, लसूण, जिरं यांची एकत्रितपणे पेस्ट करा.
त्यानंतर भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल टाका. त्यात मिरचीची पेस्ट टाका.
यांनतर त्यात हळद, कढीपत्ता टाका. आणि सर्व मिक्स करून घ्या. ही भाजी थोडा वेळ गॅसवर ठेवा.
यांनतर एका भांड्यात बेसन पीठ घ्या त्यात थोडी मिरची पावडर टाका.या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी टाका.
त्यांनतर भाजीचे चपटे गोळे बनवून घ्या. हे गोळे पिठात बुडवून तळून घ्या.
त्यांनतर बटाटेवडे थोडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुम्ही हे वडे चटणी सोबत खाऊ शकतात.