Modak Recipe: खसखस किसून नारळ बनवा साजूक तुपातले उकडीचे मोदक, वाचा रेसिपी

Ukdiche / Steamed Modak Recipe in Marathi: घरात आजी जसे मोदक बनवते तसे बऱ्याच महिलांना बनवता येत नाहीत. त्यामुळेच नवीन जेवण बनवणाऱ्या महिला किंवा तरुणींसाठी आम्ही उकडीच्या मोदकांची सिंपल रेसिपी आणली आहे.
Steamed Modak Recipe | उकडीचे मोदक
Modak RecipeSaam TV

संकष्टी किंवा चतुर्थी आली की प्रत्येक घरात मोदक हमखास बनवले जातात. अनेक व्यक्तींना उकडीचे मोदक फार आवडतात. मात्र घरात आजी जसे मोदक बनवते तसे बऱ्याच महिलांना बनवता येत नाहीत. त्यामुळेच नवीन जेवण बनवणाऱ्या महिला किंवा तरुणींसाठी आम्ही उकडीच्या मोदकांची सिंपल रेसिपी आणली आहे.

Steamed Modak Recipe | उकडीचे मोदक
Palak Idli Recipe: एकदम पौष्टिक नाश्त्याला बनवा साउथ स्टाईल पालक इडली; लहान मुले आवडीने खातील, सोपी रेसिपी वाचा

साहित्य

तांदळाचं पीठ

तूप

पाणी

नारळ

गूळ

सुका मेवा

खसखस

कृती

उकडीचे मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला तांदळाच्या पिठाची छान उकड काढून घ्या. त्यासाठी आधी एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यामध्ये वाटीभर तांदळाचे पीठ टाकून घ्या. पीठ शिजत असताना ते लाटण्याने छान घाटून घ्या. पिठाला उकड काढत असताना त्यामध्ये गरजेनुसार तूप देखील मिक्स करा.

सारण

सारण बनवण्यासाठी आधी ओला नारळ फोडून घ्या. या नारळाला वरती असलेला काळा भाग काढून टाका. त्यानंतर संपूर्ण नारळाचे बारीक तुकडे करा. हे तुकडे मिक्सरला छान बारीक करून घ्या. पुढे गूळ घ्या. गूळ छान बारीक किसून घ्या. किसलेला गूळ एका भांड्यात काढून घ्या.

आता सारण बनवताना सुरुवातीला मोठी कढई घ्या. त्यात खसखस 1 मिनिट भाजून घ्या. खसखस जास्तवेळ भांड्यात ठेवू नका. ती लगेच जळू शकते. पुढे यामध्ये गूळ आणि खोबरं टाकून घ्या. गूळ वितळला की त्यात वेलची, सुका मेवा आणि खसखस टाकून घा. संपूर्ण मिश्रण एकजीव होऊ द्या.

गूळ वितळल्यावर मिश्रण पातळ झालेलं दिसेल. हे मिश्रण पूर्ण सूक्क होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. पुढे उकडीचे छोटे गोळे बनवा. पाण्याचा हात घेऊन त्याची छोटी चपाती करा आणि त्यात सारण भरून घ्या. तसेच हाताने छान आकार देत कळ्या पडून मोदक बनवून घ्या.

एकीकडे मोदक तयार होत असताना दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. या पाण्याला उकळी आल्यावर त्यावर एक चाळणी ठेवून मोदक 5 ते 7 मिनिटांत उकडवून घ्या.

Steamed Modak Recipe | उकडीचे मोदक
Guava Chutney Recipe: सोप्या पद्धतीनं बनवा घरच्या घरी पेरुची अंबट गोड चटणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com