ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पेरू, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरे, चाट मसाला, मीठ, लिंबू.
सर्वप्रथम पेरूची चटणी बनवण्यासाठी पेरु स्वच्छ पाण्यानी धुवा.
धुतलेले पेरु चांगल्या कपड्याने पूसून त्याचे चार तुकडे तरून घ्या.
त्यानंतर पेरूमधील बिया काढून पेरू व्यवस्थित किसून घ्या.
मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ, चाट मसाला, आलं घालून बारीक पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट एका भांड्यात काढून पेस्टमध्ये किसलेला पेरू आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
आंबट गोड आणि चविष्ट पेरूची चटणी तयार आहे.