Prostate cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Early detection prostate cancer : गेल्या ४ महिन्यांत ५ पैकी ३ पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं निदान; पुरुषांनी शरीरातील 'हे' बदल वेळीच ओळखावेत!

How to diagnose prostate cancer: आजकाल पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतंय. विशेषतः ५० वर्षांवरील पुरुषांमध्ये. गेल्या काही महिन्यांत निदान झालेल्या प्रकरणांमध्येही वाढ दिसून येत आहे. ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतात पुरुषांमध्ये मूत्रमार्गाच्या कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतंय. मुळात ही एक असून ही एक चिंताजनक बाब ठरतेय. प्रोस्टेट, मूत्राशय, मूत्रपिंड आणि टेस्टिक्युलर कॅन्सरसह मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे प्रमाण सध्या वाढत असल्याचं दिसून येतं. यावर वेळीच उपचार व निदान गरजेचे आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील मूत्र विकार तज्ज्ञ डॉ. पवन रहांदळे म्हणाले की, मूत्रमार्गाच्या कॅन्सरच्या पुरुषांच्या प्रजनन प्रणालीच्या काही भागांसह मूत्र तयार करणाऱ्या आणि उत्सर्जित करणाऱ्या अवयवांवर दुष्परिणाम होतो. कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर, जो ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आढळून येतो , मूत्राशयाच्या कर्करोगात मूत्रावाटे रक्तस्राव आढळून येते.

मूत्रपिंडाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात चटकन लक्षात येत नाही आणि अंडकोषाचा (टेस्टिक्युलर) कॅन्सर हा तरुण वयोगटातील पुरुषांमध्ये सामान्यपणे आढळून येतो. मूत्राशय, मूत्रपिंड आणि अंडकोषाचा कॅन्सर हा ३० ते ६५ वयोगटातील पुरुषांमध्ये दिसून येतो. शिवाय, या प्रत्येक कर्करोगाचे स्वरूप वेगवेगळे असते, परंतु वेळीच निदान झाल्यास त्यावर मात करता येते. दुर्देवाने अनेक रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे ही किरकोळ किंवा वयाशी संबंधित आहेत असे समजून निदानास उशीर होतो, असंही डॉ. पवन रहांदळे यांनी सांगितलंय.

काय आहे याची लक्षणं?

१० कर्करुग्णांपैकी ४ रुग्णांमध्ये सुरुवातीची लक्षणं दिसली परंतु वैद्यकीय मदत घेण्यास उशीर झाला ज्यामुळे त्यांचा रोग प्रगत अवस्थेत गेला. २ जणांना प्रोस्टेट कॅन्सर, १ व्यक्तीला मूत्राशयाचा कॅन्सर आणि १ व्यक्तीला मूत्रपिंडाचा कॅन्सरचं निदान झालं. लघवीवाटे रक्त येणं, वारंवार लघवीची इच्छा होणे किंवा लघवी करताना त्रास होणे, पाठीच्या खालच्या भागात किंवा ओटीपोटात अस्पष्ट वेदना किंवा टेस्टिक्युलर आकारात बदल यासारख्या लक्षणं आढळून येतात. एकदा कर्करोगाचे निदान झाले की उपचार हे कर्करोगाच्या प्रकारावर आधारित असतात. डॉक्टर तुमच्यासाठी उपचारांची अचूक योजना आखतील.

पुरुषांमध्ये मूत्रमार्गाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. अनेकांना प्रोस्टेट, मूत्राशय, मूत्रपिंड आणि अंडकोषाच्या कॅन्सरचं निदान होत असून त्यांनी उपचारांना उशीर करू नये. मोठ्या संख्येने पुरुष रुग्ण लघवीला त्रास होणे किंवा मूत्रावाटे रक्त येणे याकडे दुर्लक्ष करतात, कारण ते त्यांना ते किरकोळ संसर्गाचे लक्षण वाटते. परंतु ही गंभीर आजाराची सुरुवातील लक्षणे असू शकतात.

प्रोस्टेट आणि किडनी कॅन्सरच्या रूग्णांचं प्रमाण वाढलं

गेल्या ३-४ महिन्यांत, ५ पैकी ३ पुरुषांना प्रोस्टेट कर्करोग आणि २ पुरुषांना मूत्राशय कर्करोगाचे निदान झाले आहे. ५० वर्षांनंतर नियमित तपासणी करणे, विशेषतः कौटुंबिक इतिहास किंवा विद्यमान मूत्रमार्गाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी ही तपासणी करणे अतिशय गरजेचं आहे. प्रोस्टेट कर्करोग ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना होतो आणि त्याचे निदान पीएसए चाचण्या आणि बायोप्सीद्वारे केले जाते. ३० ते ६५ वयोगटातील पुरुषांमध्ये मूत्राशय, मूत्रपिंड आणि अंडकोषाचा कर्करोग आढळून येतो.

तळेगावच्या टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रशांत चंद्र यांनी सांगितलं की, मूत्राशय कर्करोगात मूत्रावाटे रक्तस्राव होणं तसंच सिस्टोस्कोपी आणि इमेजिंगद्वारे त्याची निदान केलं जातं. मूत्रपिंडाचा कॅन्सर बहुतेकदा सुरुवातीला दिसून येत नाही आणि त्याचा शोध घेण्यासाठी स्कॅनची आवश्यकता भासते. तर तरुण पुरुषांमध्ये अंडकोषाचा कॅन्सर हा अल्ट्रासाऊंड आणि ब्लड मार्करद्वारे शोधला जाऊ शकतो.

कसे केले जातात उपचार?

कर्करोगाच्या टप्प्यानुसार शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा केमोथेरपीसारखे उपचार ठरविले जातात. वेळीच निदान केल्यास कर्करोगावर मात करता येऊ शकते, कर्करोग पसरण्यापूर्वी त्यावर उपचार करणे शक्य होते. जागरूकता आणि वेळोवेळी वैद्यकिय तपासणी एखाद्याचा अमूल्य जीव वाचवू शकते, असंही डॉ. प्रशांत चंद्र यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT