Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Siddhi Hande

चना कोळीवाडा

संध्याकाळी आपल्याला अनेकदा काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. यासाठी तुम्ही छान चना कोळीवाडा बनवू शकतात.

Chana Koliwada recipe | Google

साहित्य

काबूली चणे, तेल, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, लाल मिरची पावडर, बेसन आणि तांदळाचे पीठ

Chana Koliwada recipe | Google

चणे भिजत घाला

सर्वात आधी तुम्हाला काबुली चणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यानंतर ५ तास भिजत ठेवायचे आहे.

Chana Koliwada recipe | Google

चणे उकडून घ्या

यानंतर तुम्हाला कुकरमध्ये काबुली चणे उकडवून घ्यायचे आहेत. हे चणे जास्त शिजणार नाही याची काळजी घ्या.

Chana Koliwada recipe | Google

मसाला बनवा

यानंतर एका भांड्यात गरम तेल घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद, जिरे पूड, गरम मसाला,घरचा मसाला आणि मिरची पावडर टाकून मिक्स करा.

Chana Koliwada recipe | Google

बेसन पीठ

यानंतर तुम्हाला या मसाल्यात बेसन आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करायचे आहे.

Chana Koliwada recipe | Google

मिश्रणात काबुली चणे टाका

यानंतर या मिश्रणात काबुली चणे टाका. किंवा काबुली चण्यांवर हे मिश्रण छान लावून घ्या.

Chana Koliwada recipe | Google

तेल

यानंतर एका बाजूला कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेलाला छान उकळी येऊ द्या.

Google

कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

या तेलात हे चणे एकेक करुन सोडा. यानंतर हे चणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.

Chana Koliwada recipe | Google

Next: नाशिकला फिरायला जाताय? मग पेरूची वाडीला जरूर भेट द्या!

Nashik | GOOGLE
येथे क्लिक करा