ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही जर नाशिकला फिरायला जायचा प्लॅन करित असाल तर नाशिक मधील पेरुची वाडी येथे नक्की भेट द्या.
पेरुची वाडी हे ठिकाण अस्सल मिसळ थाली करिता ओळखले जाते. येथे चुलीवरची मिसळ अप्रतिम मिळते.
पेरुची वाडी उघडण्याचे तास सकाळी ८:३० ते संध्याकाळी ४:०० पर्यंत आहे. वाडी जरी दुपारी ४ वाजता बंद होत असेली तरी, तुम्ही बर्ड पार्कला भेट देऊ शकता जे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले असते.
पेरुची वाडी हे ठिकाण कुटुंब आणि मित्रांसाठी मुंबईजवळील वन डे पिकनिक स्पॉट आहे.
या वाडीचे मुख्य आकर्षण म्हणजे पक्षी आहेत. येथे विविध प्रकारचे पक्षी पाळले आहेत. तुम्ही जाऊन पक्ष्यांना तुमच्या हातांनी खायला घालू शकता आणि पक्ष्यांसोबत फोटो ही काढू शकता.
तसेच लहान मुलांनकरिता अनेक अॅक्टिव्हिट्ज आहेत. सेल्फी पॉइंट्स, झुले, गेम्स, बलुन शूट आणि ट्रॅम्पोलिन सारख्या अनेक गोष्टी आहेत.
या ठिकाणी बाजूला एक नदी असल्यामुळे येथे बोटिंगचा आनंद घेता येतो आणि पाण्यातील इतर अॅक्टिव्हिट्ज करता येतात.
पेरूच्या वाडीत पेरू पासून बनले जाणारे पेरूचे फ्रेश आइस्क्रीम येथे प्रसिद्ध आहे. अनेकजण पेरूच्या आइस्क्रीमचा आस्वाद घेतात.
मिसळ व्यतिरिक्त तुम्ही पेरूपासून बनलेल्या विविध पदार्थांचा आनंद घेऊ शकता. जसे की, पेरू आइस्क्रीम, पेरूचा रस आणि पेरूचा चहा इत्यादी.