
आपल्यापैकी प्रत्येकाला फीट आणि फाईन राहायचं असतं. यासाठी प्रत्येक जण वजन कमी करण्यावर भर देतो. यावेळी तुम्ही डाएटिंग किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळता. मात्र आज आम्ही तुम्हाला योगाच्या मदतीने वजन कसं कमी करायचं याबाबत माहिती देणार आहोत.
सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण योगाभ्यास मानला जातो. जो संपूर्ण शरीराच्या स्नायूंवर काम करतो. यात एकूण १२ स्टेप्स आहेत. ज्यामुळे शरीर लवचिक बनते आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी सूर्यनमस्काराच्या किमान ५ फेऱ्या करा आणि हळूहळू त्याची संख्या वाढवा.
सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर लगेच करणे सर्वात फायदेशीर आहे.
कपालभाती केवळ पोटाची चरबी कमी करत नाही तर पचनसंस्थेला देखील सुधारण्यास मदत करतं. ते शरीरातील घाण काढून टाकतं आणि चयापचय गतिमान करतं.
हे करण्यासाठ आरामदायी स्थितीत बसा. यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि पोट आत खेचत जोरात श्वास सोडा. हे सतत ५-१० मिनिटं करा.
सकाळी रिकाम्या पोटी हे करणं अधिक फायदेशीर आहे.
या हे योगासनामुळे खासकरून पोट आणि मांडीची चरबी कमी करण्यास मदत करते. ते मुख्य स्नायूंना बळकटी देतं आणि शरीराला संतुलन राखण्यास शिकवतं.
हे आसन पाठीवर झोपा, नंतर पाय आणि डोकं एकत्र उचला जेणेकरून शरीर बोटीच्या आकारात येईल. १५-३० सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर हळूहळू परत या.
सकाळी किंवा संध्याकाळी, जेवणानंतर ३ तासांनी करा.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.