late night sleep depression risk saam tv
लाईफस्टाईल

Late Night Sleep: रात्री १ वाजता झोपणाऱ्यांना डिप्रेशनचा धोका; लेट नाईट स्लीप पॅटर्न मानसिक आरोग्यासाठी घातक

late night sleep depression risk: OTT वर सिरीज पाहणं किंवा रात्री ऑफिसच्या कामाने उशीरापर्यंत जागणं ही गोष्ट आता सामान्य झाली आहे. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार ही गोष्ट तुमच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरतेय.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीची जीवनशैली, रात्री उशीरापर्यंत ऑफिसचं काम किंवा उशीरापर्यंत मोबाईलवर सिरीज पाहत बसणं यामुळे झोपायला अनेकांना रात्रीचा १ वाजतो. रात्री झोपायला उशीर झाला की, सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. मात्र तुम्हाला माहितीये रात्री उशीरापर्यंत जागं राहणं हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशीरापर्यंत झोपणं हे, तुमची झोप, डोकं आणि मूड यांच्यावरही परिणाम करतं.

रात्री उशीरा झोपणं का धोकादायक?

2024 मध्ये Psychiatric Research मधील अभ्यासानुसार, रात्री १ वाजल्यानंतर झोपणाऱ्यांमध्ये एंग्जायटी डिसऑर्डर आणि डिप्रेशन याचा धोका दिसून आला. हा धोका त्या व्यक्तींमध्ये दिसून आला ज्या व्यक्ती स्वतःला नाईट आऊल म्हणत होते.

मानसिक आरोग्यावर होतो थेट परिणाम

संशोधनात असं आढळून आलं की, जे लोक रात्री १ वाजण्यापूर्वी झोपतात त्यांचं मानसिक आरोग्य तुलनेने चांगलं असतं. ज्या व्यक्ती लोक रात्री उशिरापर्यंत जाग्या राहतात त्यांना मूड स्विंग, चिडचिडेपणा, ताण आणि थकवा येण्याची शक्यता जास्त असते.

सर्केडियन रिदममध्ये होतो बदल

आपले बायोलॉजीकल क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम हे शरीराला कधी झोपायचं आणि कधी जागं व्हायचं याची माहिती देत असतं. रात्री उशिरा झोपल्याने हे चक्र बिघडतं, ज्यामुळे अस्थिर होतं. परिणामी सकाळी उठण्यास त्रास होतो आणि दिवसभर सुस्तपणा आणि उर्जेची कमतरता जाणवते.

हा अभ्यास जवळपास 75,000 प्रौढ व्यक्तींवर करण्यात आला. या अभ्यासातून असं दिसून आलं की, रात्री उशीरा झोपणाऱ्यांमध्ये ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी (blood sugar fluctuation) जास्त होत होतं. त्याचप्रमाणे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे दीर्घकालीन आजार आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. रात्री उशिरा झोपणाऱ्यांना कॉर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं. ज्याचा परिणाम मूड आणि मानसिक आरोग्यावर होतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीचा क्रोनोटाइप (body clock) वेगळं असतं. जर एखादी व्यक्ती उशीराने झोपून ७-८ तासांची झोप पूर्ण करत असेल तर ही गोष्ट आरोग्यासाठी योग्य मानली जाते. मात्र जर रात्री उशीरा झोपून तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागत असेल तर तुमची झोप पूर्ण होत नाही.

जर तुम्ही दररोज रात्री १-२ वाजता झोपत असाल तर तुम्ही स्लो-वेव स्लीप मिस करता. यामध्ये ग्रोथ हॉर्मोन रिलीज होऊन शरीर स्वतःला रिपेअर करतं आणि तुमचं डोकं डिटॉक्स करण्यास मदत करतं. त्यामुळे जर तुम्हालाही रात्री १ वाजता झोपण्याची सवय असेल तर ती आजचं बदला.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026: नवरा-बायकोला एकत्र फाइल करता येणार इन्कम टॅक्स, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Buldhana : मध्यरात्री अग्रवालांच्या घरात सशस्त्र दरोडा, बाप-लेकावर तलवारीने वार, अन्...

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी; विशालने थेट कॅप्टन आयुषवर केले आरोप, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

गुडन्यूज! लाडकीच्या खात्यात ₹२१०० येणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हाणाले

SCROLL FOR NEXT