Heart Attack: रक्तदाब किती प्रमाणात वाढला की हार्ट अटॅक येऊ शकतो? जाणून घ्या

high blood pressure heart attack risk: आरोग्यतज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा झटका येण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. रक्तदाब सतत जास्त राहिल्यास हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
heart attack signs
heart attackgoogle
Published On

हार्ट अटॅकला कारणीभूत म्हणजे उच्च रक्तदाब. पण तुम्हाला माहिती आहे का, रक्तदाब किती वाढल्यावर हृदयविकाराचा धोका वाढतो? आजकाल हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. ही परिस्थिती इतकी गंभीर असते की त्यामुळे व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

हार्ट अटॅक आला की, हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा थांबतो. त्यामुळे हृदयाच्या पेशी मरू लागतात. हृदयविकाराच्या झटक्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. शरीरात रक्तदाब जास्त प्रमाणात वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.

heart attack signs
Kidney stone symptoms: 'ही' लक्षणं दिसत असतील समजा किडनीमध्ये झालेत स्टोन; शरीरातील बदल ओळखून वेळीच उपचार करा

रक्तदाब वाढल्याने धोका कसा वाढतो?

ज्यावेळी रक्तदाब खूप वाढतो, तेव्हा धमन्यांवरचा ताण वाढतो. त्याचा परिणाम होऊन त्या खराब होतात. धमन्यांचं नुकसान झाल्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी, ऑक्सिजन आणि इतर पोषक घटक हृदयाच्या स्नायूंना योग्य प्रमाणात मिळत नाहीत. ही स्थिती हृदयविकाराच्या झटक्याचं कारण ठरतं.

किती रक्तदाब वाढल्यावर हृदयविकाराचा धोका वाढतो?

  • 120/80 – सामान्य

  • 120-139/80-89 – Pre Hypertension

  • 140-159/90-99 – उच्च रक्तदाबाची पहिली पायरी

  • 160/100 किंवा अधिक – उच्च रक्तदाबाची तिसरी पायरी

heart attack signs
Morning symptom of cancer: सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं दिसतं कॅन्सरचं हे लक्षण; 99% लोकं करतात इग्नोर

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुमचा रक्तदाब 120/80 असेल तर तो सामान्य मानला जातो. या प्रमाणापेक्षा थोडा जास्त किंवा कमी असणं ही मोठी समस्या नाही. मात्र जर रक्तदाब 140/90 किंवा त्याहून अधिक झाला तर काळजी घेणं गरजेचं आहे. ही स्थिती हृदयविकाराचा धोका वाढवू शकते.

heart attack signs
Kidney Issues: किडनी खराब होण्यापूर्वी डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' बदल; 99% लोकं सामान्य समजून करतात दुर्लक्ष

उच्च रक्तदाब रूग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

या रूग्णांना जर छातीत वेदना, जळजळ किंवा दडपण जाणवलं, वरच्या पाठीमध्ये किंवा छातीभोवती वेदना झाली, श्वास घेण्यास त्रास झाला, दोन्ही हात, डोके किंवा पाठीमध्ये वेदना झाली, जास्त घाम आला किंवा मळमळ झाली, तर त्वरित डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

heart attack signs
Kidney damage symptoms: सकाळी अंथरूणातून उठताच ही लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब झालीये; 99% लोकं करतायत दुर्लक्ष

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com