clove health benefits google
लाईफस्टाईल

Cholesterol Control Tips: दररोज हा १ पदार्थ खाल्याने कोलेस्टेरॉलचा धोका होईल कमी; वाचा फायदे

Clove Benefits: दररोज एक लवंग खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं आणि सूज कमी होते. लवंगमधील Eugenol हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या समस्यांपासून नैसर्गिक संरक्षण देतं.

Sakshi Sunil Jadhav

दररोज एक लवंग खाल्ल्याने Heartच्या समस्या कमी होतात.

लवंगाचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं आणि सूज कमी होते.

Eugenol संयुग हृदयविकारांपासून नैसर्गिक संरक्षण देतं.

लवंग रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवून रक्तप्रवाह सुधारतं.

लवंग म्हणजे फक्त मसाल्याचा स्वाद वाढवणारा घटक नाही, तर ती आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. Syzygium aromaticum या वनस्पतीच्या फुलांच्या कळ्यांपासून मिळणारी लवंग सुगंधी आणि औषधी गुणांनी समृद्ध आहे. दररोज फक्त एक लवंग खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारतं, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं आणि शरीरातील सूज कमी होते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

लवंगमध्ये Eugenol नावाचं जैविक संयुगे मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यात अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ही संयुग शरीरातील oxidative stress कमी करतात, जे हृदयाच्या रोगाचं एक मोठं कारण आहेत. अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सचे प्रमाण कमी होतं आणि रक्तवाहिन्यांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होत. शिवाय सूजही कमी होते. त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाणही नैसर्गिकरीत्या संतुलित राहतं.

संशोधनानुसार, लवंग नियमित सेवन केल्यास LDL म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल कमी होतं आणि HDL म्हणजे चांगलं कोलेस्टेरॉल वाढतं. यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि अ‍ॅथेरोस्क्लेरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो. लवंगमधील Eugenol हे संयुग LDL च्या ऑक्सिडेशनला थांबवतं, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक तयार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि हायपरटेन्शनपासून संरक्षण मिळतं.

हृदयाच्या आरोग्याशिवाय लवंगाचे इतरही अनेक फायदे आहेत. ती शरीरातील सूज कमी करते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि पचनसंस्थेची कार्यक्षमता सुधारते. पारंपरिक औषधांमध्ये लवंगाचा वापर पोटदुखी, गॅस आणि अपचनावर केला जातो. तसेच, लवंगातील Eugenol हे दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्या कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय मानलं जातं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लवंग खाण्याने हृदयाचं आरोग्य खरंच सुधारतं का?

लवंगमधील Eugenol संयुग रक्तवाहिन्यांतील सूज कमी करतं आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण संतुलित ठेवतं.

रोज एक लवंग खाल्ल्याने काय फायदे होतात?

हृदय मजबूत होतं, वाईट कोलेस्टेरॉल कमी होतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

लवंग कोलेस्टेरॉल कमी करण्यात कशी मदत करतं?

वाईट कोलेस्टेरॉल कमी करून चांगलं कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात.

लवंग खाण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर एक लवंग खाल्ल्यास औषधी गुण अधिक परिणामकारक ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT