Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : 'या' गोष्टींमुळे तुमचाही ब्रेकअप होऊ शकतो; जाणून घ्या आणि नातं तुटण्याआधीच वाचवा

Relationships Way To Break up : कोणतंही नातं एका दिवसात तुटत नाही. काही दवसांपूर्वीच नातं तुटेल अशा घटना घडू लागतात. त्यामुळे आज त्याबद्दल जाणून घेऊ आणि नातं तुटण्याआधीच ते वाचवू.

Ruchika Jadhav

प्रत्येक नात्यामध्ये प्रेम आणि भांडणे दोन्हीही पाहायला मिळतात. मात्र या गोष्टींचा समतोल राखला नाही तर गोष्टी विकोपाला जातात आणि नातं (Relation) कायमचं तुटतं. कपलमध्ये सुरुवातीला फार प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. मात्र नंतर विश्वास बसणार नाही इतकी भांडणे देखील होतात. ही भांडणे अनेकदा गैरसमज झाल्याने होतात. कोणतंही नातं एका दिवसात तुटत नाही. काही दवसांपासून नातं तुटेल अशा घटना घडू लागतात. त्यामुळे आज त्या बद्दल जाणून घेऊ आणि नातं तुटण्याआधीच ते वाचवू.

पार्टनरला त्याचा वेळ द्या

प्रत्येक व्यक्तीला स्वतःची एक पर्सनल स्पेस हवी असते. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्याप्रमाणे तुमच्या जोडीदाराला देखील त्याची स्पेस द्या. जर काळजीमुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रत्येक गोष्टीत ओरडत असाल, तुम्ही सतत काळजीचे नाव पुढे करून तुमचा पार्टनर लॉयल आहे की नाही हे चेक करत असाल तर हे आजच थांबवा. कारण असे केल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात द्वेष निर्माण होतो.

परिस्थिती समजून घ्या

अनेकदा समजदार पार्टन (Partner) न मिळाल्याने नाती तुटतात. तुमच्या पार्टनरकडून काही चूक झाली, किंवा तुम्हाला न पटणारी गोष्ट त्याने केली तर त्याला समजून घ्या. पार्टनरने असं नेमकं का केलं ते जाणून घ्या. त्याला सतत त्यावरून रोखू नका. त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ती समजून घ्या. परिस्थिती माहीत असून देखील तुम्ही भांडण करत असाल तर तुमचं नातं तुटू शकतं.

स्पष्ट शब्दांत संवाद साधा

अनेकदा काही चुका झाल्यास आपण आपली बाजू सावरण्यासाठी गोष्ट घुमवून फिरवून बोलतो. त्यामुळे अडचणी आणखी वाढतात. त्यामुळे जे काही झाले असेल त्यावर आपल्या जोडीदाराशी स्पष्ट शब्दांत संवाद साधा. यामुळे जास्त गैरसमज होणार नाही. तसेच तुमच्या नात्यात भांडण देखील होणार नाही.

स्वार्थी विचार करू नका

प्रेम म्हणजे कायम आपल्या जोडीदाराच्या विचाराने जगणे. समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही असे वागणे. अशावेळी तुमच्या नात्यात घरच्या व्यक्तींमुळे दुरावा येत असेल आणि त्यामुळे तुमच्यात होणाऱ्या भंडणाने तुम्ही त्रस्त असाल, तर अशावेळी अनेक जण जोडीदाराला सोडून देणे पसंत करतात. मात्र असा स्वार्थी विचार कधीच करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

ZP Election : जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? आरक्षणाच्या सुनावणीचा निवडणुकीला फटका? VIDEO

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या मागे नको त्या कटकटी मागे लागण्याची शक्यता, वाचा राशीभविष्य

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT