साम टिव्ही
नोकरी करताना वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य याचं समतोल साधणं अवघड होऊन जातं.
कामाच्या ताण-तणावामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आयुष्यात वर्क लाइफ बॅलन्स असणे गरजेचे आहे.
काम आणि वैयक्तिक आयुष्य जगत असताना दोन्ही कामात समतोल ठेवा. ऑफिसमधील कामे घरी आणू नका.
कामाच्या तणावामुळे अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तुमचं आरोग्य चांगलं असेल, तर तुम्ही कामावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रीत करू शकता.
तुम्ही कामाच्या तणावामध्ये असाल, त्यावेळी तुमच्या मनातील गोष्टी इतर सहकारी मित्रांसोबत शेअर करा.
कामाचा तणाव वाढल्यास मनातील गोष्टी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत शेअर करून मन हलके करा.
निरोगी राहण्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे असते. तुम्ही फास्टफूड अधिक खात असाल तर शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
ऑफिसमधील कामाचा ताण कमी करण्यासाठी विश्रांती घेऊन ट्रिप प्लॅन करा. ट्रिपमुळे कामाचा ताण कमी होईल. त्यामुळे नवा उत्साह निर्माण होईल.