Garuda Purana saam tv
लाईफस्टाईल

Garuda Purana: मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसू लागतात हे संकेत; गरूड पुराणात सांगितली महत्त्वाची माहिती

Garuda Purana signs before death: गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. यात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या अवस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या पुराणात मृत्यूपूर्वी मनुष्याला दिसणाऱ्या काही विशेष चिन्हांचा उल्लेख केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सनातन धर्मामध्ये गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक मानण्यात येतं. त्यामुळे त्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गरुड पुराणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपासून ते आत्म्याच्या अंतिम प्रवासापर्यंतचे वर्णन सांगण्यात आलं आहे. या ग्रंथात सांगितलं आहे की, मृत्यू हे जीवनाचं शाश्वत सत्य आहे. ज्याला कोणीही टाळू शकत नाही. ज्याच्या मृत्यूची वेळ लिहिलेली असते, ती वेळ आल्यावर मृत्यू निश्चित येतो. त्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला मृत्यू अटळ आहे.

मात्र असं मानलं जातं की, एखाद्या व्यक्तीच्या अंतिम श्वासापूर्वी त्याला काही संकेत मिळतात. ज्यामुळे मृत्यू जवळ आल्याचं कळतं. गरुड पुराणात या संकेतांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे संकेत नेमके कोणते आहे ते पाहूयात.

स्वतःची सावली दिसेनाशी होणं

गरुड पुराणात सांगितलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला त्याची सावली दिसेनाशी झाली. तर तो मृत्यूचा संकेत मानला जातो आणि त्या व्यक्तीचा अंत जवळ आला आहे असं समजावं.

पूर्वजांचं बोलावणं

जर एखाद्या व्यक्तीला अचानक त्याचे पूर्वज दिसू लागले आणि त्यांनी त्याला जवळ बोलावलं तर याचा अर्थ त्याचा वेळ आला आहे आणि मृत्यू समीप आहे.

यमदूतांचे दर्शन

गरुड पुराणानुसार, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं जीवन शेवटाकडे असतं तेव्हा त्याच्या आजूबाजूला काही संकेत दिसू लागतात. मृत्यू जवळ आल्यावर त्या व्यक्तीला यमदूत दिसू लागतात आणि त्याला असं वाटतं की, कोणी त्याला सोबत घेऊन जाण्यासाठी आलंय.

या काळात व्यक्तीला एखाद्या नकारात्मक शक्तीची उपस्थिती जाणवते

केलेल्या कर्मांची आठवण

ग्रंथात असंही सांगण्यात आलंय की, अंतिम क्षणी व्यक्तीला त्याने आयुष्यात केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मांची झलक दिसू लागते. जर एखाद्याला अचानक असा अनुभव आला तर तो मृत्यू जवळ आल्याचा संकेत मानला जातो.

हाताच्या रेषांमध्ये बदल

हाताच्या रेषांमध्ये बदल होणं हेही एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. अनेकदा व्यक्तीच्या हातावरील रेषा फिकट होतात किंवा पूर्णपणे दिसेनाशा होतात. जे अंतकाळ जवळ आल्याचे सूचक असते.

मृत्यूचं द्वार दिसणं

मृत्यूच्या काही वेळापूर्वी व्यक्तीला एक रहस्यमय अनुभव होतो. ज्यामध्ये त्याला एखादे विचित्र द्वार किंवा मार्ग दिसतो. गरुड पुराणात यालाही मृत्यू समीप असल्याचा संकेत मानला आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: थुलथुलीत पोटाची चरबी कमी करायचीये? व्यायामासोबत हे ४ टेस्टी ड्रिंक्स प्या, पोट होईल सपाट

पांढऱ्या रंगाचीच का असते टॉयलेट सीट? कारण ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Local Body Election: निवडणुका होणार, पण उमदेवारावर टांगती तलवार; ५७ ठिकाणचा निकाल न्यायप्रविष्ठ

Health Care Drink: थंडीत नक्की प्या हे हेल्दी ड्रिंक, होणार नाहीत सर्दी खोकला ताप सारखे आजार

Pune : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन; नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT