Thursday remedies for wealth saam tv
लाईफस्टाईल

Guruwar Upay: गुरुवारच्या दिवशी 'हे' उपाय देतील तुम्हाला लाभ; प्रत्येक कामात मिळणार यश

Thursday remedies for success: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पतीला समर्पित आहे. हा ग्रह ज्ञान, शिक्षण, विवाह आणि भाग्याचा कारक मानला जातो. जर एखाद्याच्या कुंडलीत गुरु ग्रह कमजोर असेल, तर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित दिवस आहे.

  • तुलसी पूजन केल्याने विष्णू प्रसन्न होतात.

  • गायीच्या दुधाने विष्णूचा अभिषेक करावा.

सनातन धर्मानुसार गुरुवारी जगतपालक भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूला अर्पण म्हणून उपवास करण्याची परंपरा आहे. गुरुवारचा व्रत प्रामुख्याने स्त्रिया पाळतात. हा व्रत केल्याने साधकाला मनोकामना पूर्ण होते त्याचप्रमाणे जीवनातील दुःखांपासूनही मुक्ती मिळते.

ज्योतिषशास्त्रात गुरुवारी काही खास उपाय करण्याचं महत्व सांगितले आहे. हे उपाय केल्याने सुख, सौभाग्य आणि समृद्धी वाढते तसंच अडलेली कामं मार्गी लागतात. जर तुम्हालाही नोकरीत पदोन्नती किंवा यश हवं असेल तर गुरुवारी पूजेच्या वेळी हे उपाय जरूर करा.

तुलसी पूजन

जर तुम्हाला भगवान विष्णूची कृपा हवी असेल तर गुरुवारी तुलसी मातेला पूजन करा. पूजेच्या वेळी तुलसीला जल अर्पण करून तीन प्रदक्षिणा घाला. तुलसी पूजनाने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. यामुळे आयुष्यात धन, सुख आणि सौभाग्य वाढते.

भगवान विष्णूचा अभिषेक

गुरुवारी भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांचा अभिषेक गायीच्या कच्च्या दुधाने करा. या वेळी विष्णु चालीसाचे पठण करणं विशेष फलदायी मानलं जातं. यामुळे दुःख आणि संकटं दूर होतात.

पिवळ्या वस्तूंचं दान

ज्यांच्या कुंडलीत गुरु ग्रह कमकुवत असेल त्यांनी गुरुवारी पूजेनंतर पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं. मक्याचे दाणे, हरभऱ्याची डाळ, बेसन, केळी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे दान करणं शुभ मानलं जातं. या दानाने गुरु ग्रहाची कृपा लाभते.

केळीच्या वृक्षाची पूजा

गुरुवारी स्नान-ध्यान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा आणि केळीच्या झाडाची पूजा अवश्य करा. यासाठी पाण्यात चिमूटभर हळद मिसळून केळीच्या झाडाला अर्घ्य द्या. या पूजनाने देवगुरु बृहस्पति प्रसन्न होतात आणि साधकावर त्यांची कृपा कायम राहते.

गुरुवारी कोणत्या देवाची पूजा करावी?

गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करावी.

विष्णूचा अभिषेक कोणत्या द्रव्याने करावा?

गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करावा.

गुरु ग्रह बळकट करण्यासाठी कोणते दान करावे?

पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे.

तुलसी पूजनाचा काय फायदा होतो?

तुलसी पूजनाने विष्णू प्रसन्न होऊन सुख-समृद्धी वाढते.

केळीच्या झाडाला अर्घ्य देण्यासाठी काय वापरावे?

पाण्यात हळद मिसळून केळीच्या झाडाला अर्घ्य द्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner News : सासू, सासरे व पत्नीचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार प्रकाश भाळसाकळे यांनी दिला सरकारला घरचा आहेर

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी छापेमारी, बॉम्बब्लास्टची होती प्लानिंग?

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT