कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी आपल्या पायाखालची जमीन सरकते. कॅन्सर हा अनुवाशिंक पद्धतीने होतो असा अनेकांना वाटतं. मात्र केवळ हे एकच कारण नसून आपल्या दैनंदिन सवयी या देखील कारणीबूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपण काय खातो, किती एक्टिव्ह असतो, श्वासावाटे कोणती घेतो आणि रोजच्या छोट्या सवयी या सगळ्यांचा कॅन्सरच्या धोक्यावर हळूहळू परिणाम होत असतो.
एका वेबसाईटला बोलताना मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ. संदीप गोयल यांनी कॅन्सरबाबत जागरूकता आणि जीवनशैलीतील बदल कसे आपल्या आरोग्यात बदल करतात यांची माहिती दिलीये.
कॅन्सर हा कधीच सहसा एका रात्रीत होत नाही. बहुतांश वेळा तो अनेक वर्षे जोखीम घटकांच्या सतत संपर्कात राहिल्याने विकसित होत असतो. हा धोका तंबाखू किंवा मद्यपानासारख्या सवयींमधून होऊ शकतो. पण त्याचबरोबर चुकीचा आहार, शारीरिक हालचाल नसणं, प्रदूषण, इन्फेक्शन आणि लठ्ठपणा यांचाही त्यामध्ये वाटा असतो. चांगली बाब म्हणजे यातील अनेक घटक आपल्या नियंत्रणात असतात.
डॉ. संदीप गोयल यांनी सांगितलं की, एका अभ्यासानुसार सुमारे ३० ते ५० टक्के कॅन्सर हे आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून टाळता येऊ शकतात.
काही प्रकरणांमध्ये आनुवंशिकता कारणीभूत असली तरी बहुतेक कॅन्सर हे बदल करता येणाऱ्या घटकांशी संबंधित असतात. यामध्ये तंबाखू, दारूचं सेवन, अयोग्य आहार, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, संसर्ग आणि पर्यावरणीय घटक यांच्या त्यामध्ये समावेश आहे.
डॉ. गोयल पुढे सांगतात की, ते HPV आणि हिपॅटायटिस बी यांसारख्या लसीकरण देखील आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. कारण या लस संसर्गाशी संबंधित कॅन्सर जसं सर्व्हायकल आणि लिव्हरच्या कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करतात.
धूम्रपान आणि तंबाखू ही अजूनही कॅन्सर टाळता येण्याची प्रमुख कारणं आहेत.
मद्यपानाचा संबंध स्तन, लिव्हर, तोंड, घसा आणि पचनसंस्थेच्या कॅन्सरशी संबंधित आहे.
प्रोसेस्ड फूड, रेड मीट जास्त प्रमाणात आणि फायबर कमी असलेला आहार कॅन्सरचा धोका वाढवतो.
सतत बसून राहण्याची जीवनशैली आणि लठ्ठपणा यांचा अनेक प्रकारच्या कॅन्सरशी संबंध असल्याचं समोर आलंय.
उन्हापासून योग्य संरक्षण न घेतल्यास त्वचेच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
वायू प्रदूषण, स्वयंपाकघरातील धूर आणि हानिकारक रसायनं यांचा दीर्घकाळ संपर्क कॅन्सरचा धोका वाढवतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.