Brain Tumor: सतत होणारी डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्यूमर तर नाही? न्यूरोसर्जनने सांगितलं कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

Persistent headaches brain tumor: सतत होणारी डोकेदुखी ही अनेकदा सामान्य कारणांमुळे होते असे मानले जाते. परंतु काही वेळा ही डोकेदुखी गंभीर आजाराचे संकेत देऊ शकते.
Brain Tumor Causes Symptoms
Brain Tumor Saam TV
Published On

डोकेदुखी अनेकदा आपण एक सामान्य समस्या समजतो. जर कधी तीव्र प्रमाणात डोकं दुखत असेल तर आपण एखादी गोळी घेऊन मोकळे होते. ताण, झोपेची कमतरता डिहायड्रेशन या कारणांमुळे अनेकदा डोकेदुखी होऊ लगाते. मात्र जर तुम्हाला सातत्याने डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

मॅक्स हॉस्पिटलचे ब्रेन अँड स्पाइनचे न्यूरोसर्जन डॉ. गौरव बत्रा यांनी सांगितलं की, अधिकतर प्रकरणांमध्ये डोकेदुखी ही सामान्य कारणांमुळे होते. मात्र काही प्रकरणांमध्ये ही धोक्याची घंटी असू शकते. ज्याचं कारण ब्रेन ट्यूमन असतो.

Brain Tumor Causes Symptoms
Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

ब्रेन ट्यूमरमुळे होणारी डोकेदुखी कशी असते?

ज्यावेळी मेंदूमध्ये ट्यूमर बनतो तेव्हा डोक्याच्या आतील भागात दबाव वाढू लागतो. हा दबाव ब्रेनच्या टिश्यूंना त्रास देतो. त्यामुळे ही डोकेदुखी काहीशी वेगळी असते. याची लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

  • सकाळी तीव्र डोकेदुखी होणं

  • खोकल्यावर किंवा वाकल्यावर वेदना होणं

  • पेनकिलर्सनेही आराम न मिळणं

Brain Tumor Causes Symptoms
Gallbladder Cancer: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा पित्ताशयाचा कॅन्सर झालाय; 'या' कारणाने ५ पट धोका वाढतो

या लक्षणांवर ठेवा नजर

ब्रेन ट्यूमरशी संबंधित डोकेदुखी होत असेल तर त्यासोबत इतर अनेक लक्षणंही दिसून येतात. जर तुम्हाला डोकेदुखीसोबत खालील समस्या येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

  • सतत मळमळ

  • उलट्या

  • दृष्टी काहीशी धुसर होणं

  • झटके येणं

  • हात किंवा पायात कमजोरी

डॉक्टरांची मदत कधी घ्यावी?

जर तुम्हाला तीव्र किंवा दीर्घकाळ टिकणारी डोकेदुखी असेल जी तुमच्या रोजच्या कामांमध्ये अडथळा आणत असेल तर डॉक्टरांकडे . जर डोकेदुखीसोबत गोंधळ, बोलण्यात अडचण किंवा संतुलन बिघडणं यासारखी न्यूरोलॉजिकल लक्षण दिसत असतील तर ताबडतोब वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे.

Brain Tumor Causes Symptoms
Fatty liver: आता घरबसल्या तुम्हाला समजेल फॅटी लिव्हरचा त्रास; तज्ज्ञांनी सांगितले शरीरात होणारे ५ मोठे बदल

लवकर निदान होणं का गरजेचं?

जरी मेंदूतील ट्यूमर फार कमी प्रकरणांमध्ये दिसत असेल तरीही लवकर निदान झाल्यास रुग्णावर वेळेत उपचार झाल्यास स्थिती सुधारू शकते. एमआरआय किंवा सीटी स्कॅन सारख्या तसासण्या निदान करण्यात मदत करतात. लवकर उपचारांमुळे गुंतागुंत कमी होते.

Brain Tumor Causes Symptoms
Cancer early symptoms: शरीरात हे 5 बदल दिसले तर समजा कॅन्सरची होतेय सुरुवात; जाणून घ्या लक्षणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com