Kidney Issues saam tv
लाईफस्टाईल

Kidney Issues: किडनी खराब होण्यापूर्वी डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' बदल; 99% लोकं सामान्य समजून करतात दुर्लक्ष

Signs of kidney failure in eyes: शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असलेल्या मूत्रपिंडाचे (Kidneys) कार्य रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याचे आहे. जर मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित चालले नाही, तर त्याचा थेट परिणाम शरीरावर आणि डोळ्यांवरही दिसू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • किडनीच्या समस्येची लक्षणे डोळ्यांमध्येही दिसतात.

  • सतत डोळे सुजलेले असणे हे किडनी नुकसानाचे लक्षण आहे.

  • अस्पष्ट दृष्टी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे लक्षण

आपल्याला वाटतं की, किडनीच्या समस्या म्हणजे थकवा, सूज येणं किंवा लघवीत होणारे बदल. पण खरं तर किडनी व्यवस्थित काम करत नसल्याची चिन्हं आपल्या डोळ्यांमध्येही दिसू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, किडनी खराब होण्यापूर्वी काही लक्षणं अशी असतात जी आपल्याला डोळ्यांमध्ये दिसून येतात.

किडनीशी संबंधित ५ डोळ्यांची लक्षणं

किडनी शरीरातील घातक द्रव्यं गाळून टाकते आणि शरीराचा समतोल राखते. पण ती कमजोर होऊ लागली तर काही सुरुवातीची लक्षणं डोळ्यांमध्येही दिसतात. ही लक्षणं काय आहेत ती पाहूयात.

सततची डोळ्यांची सूज

सकाळी उठल्यावर डोळे सुजलेलं दिसणं सामान्य आहे. पण ही सूज पुरेशी विश्रांती घेतल्यावरही न उतरल्यास ती ‘प्रोटिन्युरिया’चं लक्षण असू शकतं. यात लघवीतून प्रोटीन बाहेर पडतं. जे किडनीच्या नुकसानीकडे स्पष्ट इशारा देते.

अस्पष्ट दिसणं

अचानक धूसर दिसणं हे उच्च रक्तदाब किंवा मधुमेहामुळे होऊ शकतं. हे दोन्ही आजार किडनीच्या समस्यांचं प्रमुख कारण मानलं जातात. यामुळे डोळ्यांतील लहान रक्तवाहिन्या खराब होतात आणि अचानक दृष्टी कमी होण्याचा धोका निर्माण होतो.

कोरडेपणा व डोळ्यांमध्ये खाज

दीर्घकालीन किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांमध्ये विशेषतः डायलिसिस घेणाऱ्यांमध्ये डोळ्यांचा कोरडेपणा जाणवतो. हे शरीरातील काही घटकांचा समतोल बिघडल्यामुळे होतं. त्यामुळे डोळे कोरडे, खडबडीत किंवा अस्वस्थ वाटतात.

डोळे वारंवार लाल होणं

डोळ्यांचे वारंवार लालसर होणं हे अनियंत्रित रक्तदाब किंवा मधुमेहाचं लक्षण असू शकतं. क्वचित प्रसंगी, लुपस नेफ्रायटिससारख्या किडनीसंबंधी आजारामुळेही डोळ्यांमध्ये समस्या उद्भवू शकतात.

रंग ओळखण्यात अडचण

काहीवेळा किडनीच्या आजारामुळे डोळ्यांच्या मागील पडद्यावर (रेटिना) किंवा दृष्टी नसावर परिणाम होतो. त्यामुळे विशेषतः निळ्या आणि पिवळ्या रंगांच्या छटा व्यवस्थित दिसत नाहीत.

किडनी खराब होण्याचे डोळ्यांमधील प्रमुख लक्षण कोणते?

सततची डोळ्यांची सूज हे प्रमुख लक्षण आहे.

डोळे सुजण्यामागील वैद्यकीय कारण काय आहे?

प्रोटिन्युरिया, म्हणजे लघवीत प्रोटीनचे नुकसान.

अस्पष्ट दृष्टी कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांचे लक्षण आहे.

डोळ्यांचा कोरडेपणा कोणत्या स्थितीत जाणवतो?

दीर्घकालीन किडनी आजार आणि डायलिसिस दरम्यान.

रंग ओळखण्यात अडचण कशामुळे होते?

रेटिना किंवा दृष्टी नसावर किडनी आजाराचा परिणाम.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Maharashtra Live News Update: ST प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

SCROLL FOR NEXT