Brain Veins Swelling Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Brain Veins Swelling: मेंदूच्या नसांना सूज आल्यावर शरीरात दिसून येतात 'हे' बदल; वेळीच व्हा सतर्क

Brain Veins Swelling Symptoms: मेंदूच्या नसांना सूज येणं ही एक गंभीर स्थिती असू शकते. ज्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Surabhi Jayashree Jagdish

शरीरातील अनेक भागांना सूज येण्याची समस्या जाणवते. मात्र शरीराच्या आत असलेल्या भागांवर आलेली सूज पटकन लक्षात येत नाही. यामध्ये मेंदूच्या नसांना सूज येणं ही एक गंभीर स्थिती असू शकते. ज्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मेंदूच्या नसांमध्ये सूज येण्याच्या स्थितीला सेरेब्रल एडीमा असं म्हटलं जातं.

मेंदूच्या मज्जातंतूंना काही गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि जीवनशैलीतील गडबड यामुळे ही समस्या उद्भवू शकते. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या मेंदूच्या नसांना सूज येण्याची शक्यता असते. मेंदूच्या नसांमध्ये सूज येण्याची समस्या जाणवते तेव्हा शरीरात काही बदल दिसून येतात. ज्याकडे लक्ष दिल्यास वेळीच परिस्थिती सुधारता येऊ शकते. जाणून घेऊया मेंदूच्या नसांना सूज येण्यावेळी कोणती लक्षणं दिसतात.

मेंदूच्या नसांना सूज येण्याची लक्षणं

  • सतत तीव्र डोकेदुखी होणं

  • झोप येण्यामध्ये अडचण येणं

  • विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणं

  • मान दुखणं

  • सतत उलट्या होणं

  • दृष्टी धुसरं होणं

  • बोलण्यात अडचण येणं

  • रक्तदाबात वाढ होणं

  • श्वास घेण्यामध्ये अडचण येणं

सेरेब्रल एडीमाचा धोका कोणत्या व्यक्तींना असतो?

सेरेब्रल एडेमा विकसित होण्यासाठी जोखीमीचा घटक डायबेटीज असू शकतो. ज्यामुळे तुम्हाला मधुमेह-संबंधित केटोआसिडोसिस किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. मुळात प्रौढांपेक्षा मधुमेह असलेल्या मुलांना धोका जास्त असतो. कॅन्सरसारखी समस्या किंवा कमकुवत इम्युनिटी असलेल्या लोकांमध्ये ब्रेन एडीमा विकसित होण्याचा धोका जास्त असतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT