Heart Veins Blockage Signs saam tv
लाईफस्टाईल

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; सामान्य समजून लोकं करतात इग्नोर

Heart blockage: हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्यापूर्वी शरीर अनेक प्रकारचे संकेत देते, पण लोक त्यांना सामान्य समजून दुर्लक्ष करतात. छातीत दुखणे हे हृदयविकाराचे सर्वात परिचित लक्षण असले तरी, हृदय ब्लॉकेज (Heart Blockage) होण्यापूर्वी शरीरात इतर अनेक बदल दिसून येतात, जे ओळखणे महत्त्वाचे आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयविकारातील अडथळा, ज्याला वैद्यकीय भाषेत कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा कोरोनरी हार्ट डिसीज (CHD) म्हणतात. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अरुंदपणा किंवा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. परिणामी हृदयविकाराचा झटका किंवा हृदय निकामी होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

मात्र महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी आपलं शरीर आधीपासूनच काही संकेत देत असतं. हे संकेत वेळीच ओळखणं गरजेचं आहे. जर हे संकेत ओळखले तर मोठ्या संकटापासून बचाव होण्यास मदत मिळू शकते.

हृदयविकारातील अडथळ्याची ५ सुरुवातीची लक्षणे

डॉक्टरांच्या मते, हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो जेव्हा रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. हे वेळीच ओळखणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटका टाळता येतो.

छातीत वेदना किंवा दडपण

हे सर्वांत सामान्य लक्षण आहे. छातीत दडपण, जडपणा वाटणं असा त्रास सतत जाणवत असेल तर हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. शारीरिक मेहनत घेतल्यावर किंवा मानसिक तणावात ही वेदना वाढते तर विश्रांती घेतल्यावर कमी होते.

श्वास घ्यायला त्रास होणे

थोडा चालल्यावर किंवा पायऱ्या चढल्यावरही श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ते हृदय व्यवस्थित रक्त पंप करू शकत नाही याचं लक्षण असू शकतं.

अशक्तपणा किंवा थकवा

दररोजच्या कामात अनपेक्षितपणे थकल्यासारखं वाटणं, शक्ती कमी जाणवणं हेही हृदयाला पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा न होत असल्याचे संकेत आहेत.

हात, मान, जबडा किंवा पाठीमध्ये वेदना

हृदयाशी संबंधित वेदना नेहमीच छातीत जाणवत नाहीत. कधी कधी हात, मान, जबडा किंवा पाठीमध्येही अशा वेदना होतात. त्या मसल पेन समजून दुर्लक्षित होतात.

हृदयाचे ठोके अनियमित होणे

हृदय वेगाने धडधडणं किंवा ठोके अनियमित होणं विशेषतः छातीत दडपण यासह होत असेल, तर तेही धमन्यांमध्ये अडथळा असल्याचं संकेत असू शकतात.

हृदयविकारातील अडथळ्याची कारणं

हृदयविकारातील अडथळा प्रामुख्याने अॅथेरोस्क्लेरोसिसमुळे होतो. यात धमन्यांच्या आतील भागात कोलेस्ट्रॉल, चरबी, कॅल्शियम आणि इतर घटकांचे थर साचतात. हे थर हळूहळू धमन्या अरुंद करतात आणि रक्तप्रवाहात अडथळा आणतात.

धोक्याची प्रमुख कारणं

  • रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणं

  • उच्च रक्तदाब

  • धुम्रपान

  • मधुमेह

  • स्थूलता

  • शारीरिक हालचालींचा अभाव

  • कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापुरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव कारने आईसह चिमुकल्याला उडवलं; भयानक सीसीटीव्ही VIDEO

जेवणासाठी बुलेटवरून निघाले, वाटेत भयंकर घडलं, टँकरच्या धडकेत ३ उच्चशिक्षित तरुणांचा मृत्यू

Poonam Pandey: पूनम पांडे दिसणार मंदोदरीच्या भूमिकेत; भाजप अन् विश्व हिंदू परिषदेचा विरोध, केली मोठी मागणी

Maharashtra Live News Update: पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल १२ किलो गांजा जप्त

Shocking Crime in Pimpri: खुनी जुगार; वादानंतर दाजीची सटकली,तोडले मेव्हण्याचे दोन्ही हात अन्...

SCROLL FOR NEXT