What happens after kidney infection saam tv
लाईफस्टाईल

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

What happens after kidney infection: किडनीमध्ये संसर्ग होतो, तेव्हा त्याला 'पायलोनेफ्रायटिस' असे म्हणतात. हा संसर्ग अनेकदा मूत्रमार्गातून सुरू होऊन किडनीपर्यंत पोहोचतो.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी इन्फेक्शन म्हणजेच पायलोनेफ्रायटिस हा एक गंभीर आजार आहे. ही समस्या लघवीच्या मार्गातून सुरू होऊन थेट किडनीपर्यंत पोहोचू शकतो. जर याकडे वेळेत लक्ष दिलं नाही, तर हा संसर्ग जीवघेणाही ठरू शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये तर किडनी ट्रान्सप्लांटसुद्धा करण्याची वेळ येऊ शकते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या समस्येची लक्षणं वेळीच लक्षात घेतली तर त्यावर उपचार करणं तुमच्या फायद्याचं असू शकतं.

किडनी इन्फेक्शनची सुरुवात कशी होते?

बहुतेक वेळा हे इन्फेक्शन मूत्रमार्गातून म्हणजेच युरीन पथातून सुरू होतं. जसं की लघवीच्या ट्यूबमध्ये इन्फेक्शन झालं आणि योग्य उपचार न घेतल्यास ते किडनीत जातं. याची लक्षणं कोणती दिसून येतात ते पाहूयात.

पाठीच्या किंवा कमरेच्या भागात वेदना

सतत किंवा दोन्ही बाजूंनी कंबर-पाठीमध्ये वेदना जाणवणं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अशा वेदना अचानक होत नसून दीर्घकाळ राहतात.

लघवी करताना जळजळ

जर लघवी करताना जळजळ होणं, दुखणं किंवा अस्वस्थता वाटत असेल, तर हे मूत्रमार्ग किंवा किडनी इन्फेक्शनचं संकेत असू शकतं.

लघवीमध्ये रक्त दिसणं

लघवीमध्ये जर थोडं जरी रक्त आलं, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे किडनीच्या सूज किंवा गंभीर इन्फेक्शनमुळे होतं. यावेळी तातडीनं युरीन चाचणी किंवा KFT (किडनी फंक्शन टेस्ट) करून घ्या.

सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणं

किडनी खराब होण्याची प्रक्रिया सुरू असल्यास, शरीरात टॉक्सिन्स जमा होऊ लागतात. यामुळे दिवसभर थकवा, अंगात उत्साह नसणं आणि सतत झोप लागणं ही लक्षणं दिसतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

Silent Divorce: सायलेंट डिव्होर्स म्हणजे काय? घटस्फोटाआधीच तुटतं नातं; सायलेंट डिव्होर्सचे संकेत कोणते?

Maharashtra Politics: प्रभागरचनेत कुणाचा फायदा, कुणाचा तोटा?, भाजप-शिंदेंकडून दादांची कोंडी?

SCROLL FOR NEXT