Kidney Stone Symptoms  meta ai
लाईफस्टाईल

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

कमी पाणी पिणे, जास्त मीठ खाणे, वारंवार पेनकिलर घेणे, अपुरी झोप, जंक फूड आणि गरजेपेक्षा जास्त प्रोटीन यांसारख्या सवयी किडनीचे नुकसान करू शकतात. किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी बदलणे आवश्यक आहे ते जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरात रोज अनेक प्रकारचे अपायकारक आणि निरुपयोगी पदार्थ तयार होत असतात. हे पदार्थ शरीरातून बाहेर काढण्याचं सर्वात महत्त्वाचं काम किडनी करते. याशिवाय शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि द्रवपदार्थांचा समतोल राखण्याची जबाबदारीही किडनीचीच असते. त्यामुळे शरीर व्यवस्थित कार्य करत राहते.

आजच्या धावपळीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण नकळत अशा अनेक सवयी लावून घेतो ज्या हळूहळू किडनीचे नुकसान करू लागतात. धोकादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात किडनी खराब होत असल्याची स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे समस्या वाढत जाते आणि अनेकदा उशिरा लक्षात येतं. म्हणूनच किडनीला हानी पोहोचवणाऱ्या सवयी वेळेत बदलणं खूप गरजेचं आहे.

पुरेसं पाणी न पिणं

किडनी निरोगी ठेवण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. कमी पाणी प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन पदार्थ सहज बाहेर पडत नाहीत. त्यामुळे हे पदार्थ शरीरात साचू लागतात आणि किडनीला जास्त मेहनत घ्यावी लागते. ही सवय दीर्घकाळ सुरू राहिली, तर किडनी निकामी होण्याचाही धोका वाढू शकतो.

आहारात जास्त मीठ असणं

जेवणात किंवा इतर पदार्थांमधून जास्त मीठ शरीरात गेलं तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. वाढलेला रक्तदाब किडनीतील रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. कालांतराने किडनीची रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होत जाते.

वारंवार पेनकिलर औषधं घेणं

डोकेदुखी, अंगदुखी किंवा इतर वेदना झाल्या की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता वारंवार पेनकिलक गोळ्या घेतात. पण अशा औषधांचा परिणाम थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे शक्यतो पेनकिलरचा अनावश्यक वापर टाळावा.

पुरेशी झोप न घेणं

रोज रात्री अपुरी झोप घेतल्यास शरीरात ताण वाढवणारे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. यामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते. या दोन्ही गोष्टींचा ताण किडनीवरही पडतो.

जंक फूड खाणं

बाजारात मिळणारे पॅकेज्ड स्नॅक्स, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मीठ, प्रिझर्व्हेटिव्ह आणि इतर रसायनांचं प्रमाण जास्त असतं. अशा पदार्थांचं सतत सेवन केल्यास किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि तिची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते.

गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेणं

प्रोटीन शरीरासाठी आवश्यक असलं तरी त्याचे अतिप्रमाणात सेवन करणं योग्य नाही. जास्त प्रोटीन पचवण्यासाठी आणि त्यातून तयार होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी किडनीला अधिक काम करावं लागते. दीर्घकाळ ही सवय राहिल्यास किडनी कमकुवत होण्याचा धोका वाढतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: परभणीत 7 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा

पावसाळी पर्यटनाचा प्लॅन करताय? तर मग थांबा; 'या' प्रसिद्ध ४ ठिकाणांवर प्रशासनाचे कडक निर्बंध

Politics : उद्धव ठाकरेंना जबरा धक्का; शिंदेसेनेत जाताच महिला नेत्यावर मोठी जबाबदारी

Kidney : किडनी खराब होण्याआधी शरीर देते हे 5 इशारे; सकाळीच दिसतात ही लक्षणे

SCROLL FOR NEXT