Breast Cancer Symptoms: स्तनामध्ये दिसणारी गाठ म्हणजेच कर्करोग नाही; त्वचेवर दिसणारी ब्रेस्ट कॅन्सरची ही ५ लक्षणं वेळीच ओळखा

Early Breast Cancer Signs: ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे फक्त स्तनातील गाठ नव्हे. स्तनाच्या त्वचेवर लालसरपणा, संत्र्याच्या सालीसारखी त्वचा, निप्पलभोवती रंग बदलणे, खाज किंवा जळजळ यांसारखी लक्षणेही गंभीर ठरू शकतात. वेळेत तपासणी केल्यास निदान आणि उपचाराची संधी वाढते.
Breast Cancer Symptoms
Breast Cancer Symptomssaam tv
Published On

महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येणारा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर या आजाराचं वेळेत निदान झालं तर रूग्णाचा जीव वाचू शकतो. अनेक महिलांचा असा समज आहे की, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे फक्त स्तनांमध्ये गाठ दिसून येणं. मात्र या लक्षणांशिवाय इतर अनेक लक्षणं या आजाराची शरीरात दिसून येतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलांनी त्यांच्या त्वचेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. स्तनाच्या त्वचेत कोणताही असामान्य बदल दिसल्यास तो साधा समजून दुर्लक्ष करू नका. कोणतेही वेगळे बदल दिसून आल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

स्तनाच्या त्वचेवर दिसणारी गंभीर लक्षणं

त्वचेवर संत्र्याच्या सालीप्रमाणे दिसणं

जर स्तनाची त्वचा संत्र्याच्या सालीसारखी खडबडीत दिसू लागली तर ते सामान्य लक्षण नाही. काही वेळा कॅन्सरच्या पेशींमुळे लिम्फ नोड्समध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे त्वचेत असे बदल दिसू शकतात. असं लक्षण दिसल्यास तुम्ही त्वरित तपासणी केली पाहिजे.

Breast Cancer Symptoms
Cholesterol control: शरीरात शांतपणे वाढतंय वाईट कोलेस्ट्रॉल; आजच बदला या ७ सवयी, नाहीतर वाढेल हार्ट अटॅकचा धोका

त्वचा लाल होणं

स्तनाच्या त्वचेवर सतत लालसरपणा दिसणं, सूज येणं किंवा जळजळ जाणवणं ही केवळ अॅलर्जी किंवा संसर्गाचीच लक्षणं असतील असं नाही. काही महिलांमध्ये हा बदल इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सरचा संकेतही असू शकतो. त्यामुळे ही समस्या दीर्घकाळ कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

त्वचा ताणल्यासारखी वाटणं

स्तनाभोवतीची त्वचा जाड वाटणं, कडक होणं किंवा ताणल्यासारखी जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळा कॅन्सरच्या पेशी वाढल्यामुळे त्वचेत असे बदल होऊ शकतात.

सतत पुरळ, खाज किंवा जळजळ होणं

स्तनाच्या त्वचेवर वारंवार पुरळ येणं, खाज सुटणं किंवा जळजळ होणं आणि औषधोपचार करूनही त्यात सुधारणा होत नसेल, तर हे लक्षण हलक्यात घेऊ नका. अशा वेळी कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

Breast Cancer Symptoms
Brain Tumor Symptom: हे 1 सायलेंट लक्षण दिसलं तर समजा मेंदूमध्य तयार होतोय ट्यूमर

निप्पलच्या आसपासच्या त्वचेचा रंग बदलणं

निप्पल किंवा त्याच्या आसपासच्या त्वचेचा रंग अचानक गडद होणं, काळपट दिसणं किंवा डाग पडल्यासारखं वाटणं हे देखील गंभीर लक्षण असू शकतं. अशा बदलांकडे दुर्लक्ष कऱणं महागात पडू शकतं.

वेळेत तपासणी करणं फायद्याचं?

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे फक्त गाठ येणं एवढ्यावरच हा आजार मर्यादित नाहीये. मात्र त्वचेत दिसणारे अनेक छोटे-मोठे बदलही त्याची सुरुवातीची चिन्हं असू शकतात. त्यामुळे प्रत्येक महिलेने वेळोवेळी स्वतः ब्रेस्ट सेल्फ-एक्झामिनेशन केलं पाहिजे. कोणताही संशयास्पद बदल दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

Breast Cancer Symptoms
Brain tumor symptoms: डोळ्यांना सतत धुरकट दिसतंय? चष्म्याची गरज समजून दुर्लक्ष करू नका, हे ब्रेन ट्युमरचं पहिलं गंभीर लक्षण असू शकतं

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com