Brain Tumor Symptom: हे 1 सायलेंट लक्षण दिसलं तर समजा मेंदूमध्य तयार होतोय ट्यूमर

Surabhi Jayashree Jagdish

ब्रेन ट्यूमर

ब्रेन ट्यूमर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर तीव्र डोकेदुखी, झटके अशी आपत्कालीन परिस्थिती उभी राहते. मात्र तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीची लक्षणं अनेकदा सायलेंट दिसू शकतात.

Silent Brain Tumor Symptoms | saam tv

दुर्लक्षित केली जाणारी लक्षणं

दैनंदिन ताणतणाव, झोपेची कमतरता किंवा वाढत्या वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्षित केली जातात. विशेषतः वागणूक आणि विचारांमध्ये होणारे बदल हे ब्रेन ट्यूमरचे सुरुवातीचं सायलेंट लक्षण असू शकतं.

Brain Cancer Warning Signs

वागणूक आणि विचारांमध्ये होणारे बदल

ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणं अनेकदा शारीरिक नसून वागणूक आणि विचारसरणीशी संबंधित असू शकतात. व्यक्तीच्या स्वभावात किंवा निर्णय घेण्याच्या क्षमतेत हळूहळू बदल दिसू लागतात. त्यामुळे अनेकदा या बदलांकडे गंभीरपणे पाहिलं जात नाही.

Personality Changes Brain Tumor | saam tv

चिडचिडेपणा आणि एकटेपणा वाढणं

पूर्वी शांत आणि आनंदी असलेली व्यक्ती अचानक जास्त चिडचिडी होऊ शकते. काही जण सामाजिक संपर्क टाळून स्वतःमध्येच राहू लागतात. कुटुंबातील सदस्यांना हा बदल सर्वप्रथम जाणवण्याची शक्यता असते.

Personality Changes Brain Tumor | saam tv

विसराळूपणा वाढणं

लहानसहान गोष्टी वारंवार विसरणं हे एक महत्त्वाचं लक्षण ठरू शकतं. अपॉइंटमेंट, दैनंदिन कामं किंवा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. अनेकदा हा विसराळूपणा ताण किंवा वय वाढल्यामुळे झाल्याचा समज होतो.

Brain Tumor Awareness | saam tv

एकाग्रतेचा अभाव

कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. व्यक्तीला एखाद्या विषयावर दीर्घकाळ लक्ष ठेवणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे कामगिरीवर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो.

Behavioral Changes | saam tv

दैनंदिन कामं कठीण वाटणं

पूर्वी सहज वाटणारी कामं पूर्ण करण्यासाठी अचानक जास्त प्रयत्न करावे लागू शकतात. ही लक्षणं हळूहळू वाढत असल्याने रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात.

Mental Health Symptoms | saam tv

Silent Health Symptoms
Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Silent Health Symptoms | saam tv
येथे क्लिक करा