High cholesterol warning signs saam tv
लाईफस्टाईल

Cholesterol symptoms on face: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसून येतात हे ५ प्रमुख बदल; वेळीच ओळखा लक्षणं

High cholesterol warning signs: शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास त्याचे परिणाम केवळ अवयवांवरच नाही तर चेहऱ्यावरही दिसू लागतात. तज्ज्ञांच्या मते, चेहऱ्यावर होणारे काही बदल हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे महत्त्वाचे संकेत असतात.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल बदलती लाईफस्टाईल आणि अनहेल्दी आहारामुळे अनेक समस्या आपल्या मागे लागतात. यापैकी एक म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. सध्याच्या काळात हाय कोलेस्ट्रॉल ही समस्या अगदी सामान्य मानली जातेय. मात्र ही समस्या दीर्घकाळ तुमच्या शरीरात कोणतंही लक्षणं न दिसता राहू शकते. मात्र याची काही लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात.

कोलेस्ट्रॉलच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक असू शकतं. या समस्येवर वेळेत लक्ष देणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुमचा अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. याशिवाय तुमचं शरीरही निरोगी राहतं. जाणून घेऊया हाय कोलेस्ट्रॉलचे कोणते संकेत तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात.

डोळ्यांच्या भोवती पिवळे डाग दिसणं

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या किंवा पापण्यांच्या कडांभोवती लहान पिवळे डाग दिसू लागले तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. त्यांना झेंथेलास्मा म्हटलं जातं. हे त्वचेखाली कोलेस्ट्रॉल जमा झाल्याचं लक्षणं असतं.

चेहऱ्यावर सतत पुरळ येणं

तेलकट त्वचा आणि ब्लॉकेजेसमुळे, उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये वारंवार चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात. हे शरीरात फॅट जमा झाल्याचं लक्षण आहे.

चेहरा तेलकट होणं

जर तुमचा चेहरा जास्त तेलकट दिसत असेल तर सावध व्हा. याचं कारण म्हणजे ते तुमच्या रक्तातील फॅटच्या पातळीत वाढ झाल्याचं लक्षण असू शकतं.

कॉर्नियाभोवतीचा रंग बदलणं

हाय कोलेस्ट्रॉलमुळे कॉर्नियाभोवती पांढरा किंवा ग्रे रंगाचा थर जमा होण्याची शक्यता असते. हे सहसा वयानुसार होते, परंतु तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं हे लक्षण आहे.

चेहऱ्यावर सूज येणं

जर तुमचा चेहरा सकाळी उठल्यावर सूजत असेल तर ते वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं एक लक्षण असू शकतं. डोळ्यांच्या खाली ही सूज जास्त प्रमाणात दिसून येते.

कोणती खबरदारी घ्यावी?

  • तेलकट किंवा जंक फूडचं प्रमाण कमी करावं

  • दररोज ३० मिनिटं व्यायाम करा

  • फायबरयुक्त आहार घ्या

  • स्मोकिंग आणि अल्कोहोल टाळा

  • नियमित पद्धतीने लिपीड टेस्ट करून घ्या

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

Crime News: आधी बुरखाधारी महिलेनं थांबवलं, नंतर नमाज वाचण्यासाठी जबरदस्ती अन्...; पालघरमधील महाविद्यालयात नेमकं काय घडलं?

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

SCROLL FOR NEXT