High Cholesterol Level Control Saam Tv
लाईफस्टाईल

High Cholesterol Level Control : या 5 पदार्थांमुळे सतत वाढतो कोलेस्ट्रॉल; येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, वेळीच घ्या काळजी

Cholesterol Level : रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

High Cholesterol : रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात. हल्ली लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलच्या समस्या झपाट्याने वाढत असून अनेक लोक गंभीर आजारांना बळी पडत आहेत.

त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य आहार (Diet) घेणे आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा चिकट पदार्थ रक्तात आढळतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे लेव्हल वाढल्याने रक्तभिसरण मंदावते. परिणामी हृदयविकाराचा धोका (Danger) वाढतो.

कोलेस्ट्रॉल रक्तवाहन्यांमध्ये जमा झाल्याने रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तुम्हाला छातीत दुखणे ( एंजाइम ), धमनी रोग, हृदयविकाराचा झटका यासारखे जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. हे सर्व आजार टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवणे महत्वाचे आहे.

त्यासाठी योग्य आहार खूप गरजेचा आहे. आहारात सॅच्युरेटड फॅट असलेल्या अन्नपदार्थमुळे कोलेस्ट्रॉल लेव्हले झपाट्याने वाढते. त्यासोबतच असे काही द्रवपदार्थचे तुम्ही रोज सेवन करता ज्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी वाढते. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवणाऱ्या द्रवपदार्थांबद्दल.

अल्कोहोल -

Heartuk.org.uk च्या एका अहवालानुसार,अल्कोहोलमुळे लिव्हरवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही मद्यपान केल्याने रक्तातील ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन टाळणे गरजेचे आहे. अल्कोहोल घेणे बंद केल्याने तुमचे हृदय निरोगी राहते आणि हृदयविकारांचा धोकाही कमी होण्यास मदत मिळते.

पामतेल -

इतर खाद्य तेलाच्या तुलनेत पामतेलामध्ये चरबीचे प्रमाण फार जास्त असते. त्यामुळे आहारात नियमित पामतेलाचा वापर,शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवू शकतो. पामतेल LDL कोलेस्ट्रॉल लेव्हल 0.24 mmol/L पर्यंत वाढवू शकते.

सोडा -

सोडा पिणे देखील शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्यास कारणीभूत आहे. प्रौढ लोक रोज कमीत कमी एक तरी साखरयुक्त ड्रिंक पितात. ज्यामुळे त्यांना डिस्लिमपिडोया म्हणजेच उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. परिणामी हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो.

सॉफ्ट ड्रिंक -

उन्हाळ्यातील वाढत्या तामानापासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस भरपूर प्रमाणात सेवन केले जाते. या सॉफ्टड्रिंक्समध्ये साखर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे अस्वास्थकर चरबीचे प्रमाण वाढू शकते. साखरयुक्त पेय खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकते हे अभ्यासकांना सिद्ध केले आहे.

फुल क्रीम आणि फॅट दूध -

LDL कोलेस्ट्रॉल लेव्हल चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केल्याने वाढू शकते. कारण या पदार्थांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल भरपूर असते. त्यामुळे तुम्ही फुल क्रीम दुधाऐवजी लो फॅट स्कीम मिल्क पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT