Cholesterol Level Control : काहीही केल्या तुमचा कोलेस्ट्रॉल लेवल कमी होत नाहीये? जाणून घ्या कारण व उपाय

Cholesterol Level : आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल पाहायला मिळतात.
Cholesterol Level Control
Cholesterol Level ControlSaam Tv

Cholesterol Level Control Tips : आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल पाहायला मिळतात. ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल या नावाने ओळखले जाते. चांगले कोलेस्ट्रॉल रक्तातील चरबी कमी करण्यासाठी मदत करते. हृदयापर्यंत रक्तप्रवाह सुरळीतपणे होण्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल धमन्यांना साफ ठेवते.

कोलेस्ट्रॉल हे आपल्या रक्तामध्ये उपलब्ध असलेले व्याक्स सारखे पदार्थ आहे. कोलेस्ट्रॉलची लेवल 200 mg/DL पेक्षा जास्त झाल्याने कोलेस्ट्रॉलच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच आपल्या शरीरामध्ये उपलब्ध असलेला वाईट कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानला जातो.

Cholesterol Level Control
High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचा डोळ्यांवर होतो परिणाम, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

धमन्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जमल्यामुळे हृदयापर्यंत रक्तप्रवाह सुरळीतरित्या होत नाही त्यामुळे हार्ट अटॅक (Attack) आणि स्ट्रोक खतरा वाढतो. शरीरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण चेक करण्यासाठी तुम्ही ब्लड टेस्ट करू शकता.

हाय कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करण्यासाठी योग्य डाएट (Diet) आणि लाईफस्टाईलवरती लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु अनेक वेळा हेल्दी डायट आणि लाईफस्टाईलला फॉलो करून सुद्धा व्यक्तींचे कोलेस्ट्रॉल कमी होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉलच्या कारणांविषयी.

Cholesterol Level Control
Cholesterol : तुमच्या 'या' 5 चुकीच्या सवयींमुळे कोलेस्टेरॉल राहात नाही नियंत्रणात !

तुमच्या डायटमध्ये लपले असतील हे खतरनाक फॅट्स -

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हेल्दी डायट खूप महत्त्वाचे मानले जाते. खरंतर अनेक व्यक्ती हेल्दी डायट त्याला म्हणतात ज्यामध्ये चरबी वाढेल अशा पदार्थांचा समावेश नसतो. परंतु डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, अनसेच्युरेटेड फॅट आणि लिक्विड फॅट शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात आणि सेच्युरेटेड फॅट शरीरासाठी नुकसानदायक असू शकते.

याशिवाय आणखीन फॅट असतात ज्यांना ट्रान्स फॅट म्हटले जाते. ट्रान्स फॅट हे एक असे फॅट आहे ज्याचा उपयोग सगळ्या गोष्टींमध्ये केला जातो. या फॅटला अतिशय अनहेल्दी मानले जाते. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींचे अजिबात सेवन करू नका ज्यामध्ये सेच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट असेल.

तुमचं डायट व्यवस्थित नसणे -

अनेक व्यक्ती कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यासाठी हेल्दी डायट घेतात. परंतु ही डायट कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी पर्याप्त नसते. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की ज्या व्यक्तींना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी किटो डायट घेऊ नये. एका चांगल्या डाएटसाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकता.

तुमचं कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट प्लॅन हेल्दी नसणे -

जिरो फॅट डायट आणि ऑरगॅनिक भाज्यांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल लेवल कमी केली जाऊ शकत नाही. त्यासाठी योग्य प्लॅनिंगची गरज असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला ऍक्टिव्ह ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच औषधांचे सेवन सावधानिने करा.

फिजिकल ऍक्टिव्ह नसणे -

शरीरामधील वाढते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डायटसोबत फिजिकल ऍक्टिव्हिटी देखील केली पाहिजे. शरीरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही दररोज तीस मिनिटे तरी दररोज चालेल पाहिजे.

दारूचे सेवन करणे -

दारूचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हलवर अतीशय वाईट परिणाम होतो. जर तुम्ही दररोज कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खात असाल आणि दररोज दारूचे सेवन देखील करत असाल तर, औषधांचा तुमच्या शरीरावर आणि कोलेस्ट्रॉलवर कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार दिवसा मधून एक किंवा दोन ड्रिंक करणे योग्य आहे.

औषध वेळेवर न घेणे -

कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी न होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे औषधांचा योग्य डोस न घेणे. यासाठी तुम्ही तुमच्या कोलेस्ट्रॉल लेव्हलची तपासणी करून डॉक्टरांना रिपोर्ट दाखवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com