Cholesterol : तुमच्या 'या' 5 चुकीच्या सवयींमुळे कोलेस्टेरॉल राहात नाही नियंत्रणात !

Cholesterol Level : कोलेस्टेरॉलची पातळी २०० मिलिग्रॅमपेक्षा अधिक जास्त असल्यास कोलेस्टेरॉल लेव्हल उच्च समजले जाते.
Cholesterol
CholesterolSaam Tv
Published On

Cholesterol : शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहणे फार महत्वाचे असते. अन्यथा अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य काळजी घेऊन कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

कोलेस्टेरॉलची पातळी २०० मिलिग्रॅमपेक्षा अधिक जास्त असल्यास कोलेस्टेरॉल लेव्हल उच्च समजले जाते आणि कोलेस्टेरॉल लेव्हल वाढल्याने शरीरातील रकताभिसरण मंदावते. परिणामी हृदयासंबधित आरोग्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.

Cholesterol
Bad Cholesterol : खराब कोलेस्ट्रॉलला मुळासकट दूर करण्यासाठी 'या' चटणींचा होईल फायदा, पाहा रेसिपी !

जर तुम्ही वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे त्रस्त असाल तर त्यासाठी तुमच्या काही चुकीच्या सवयी (Habits) कारणीभूत असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या 5 सवयी आहेत जे शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यास कारणीभूत आहेत.

1. योग्य आहार

तुम्हाला तुमचा डायट (Diet) प्लॅन योग्य आहे असे वाटत असेल, तरी ते कोलेस्टेरॉलसाठी पुरेसे नाही. तज्ज्ञांच्या मते जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल तर अशा वेळेस वजन कमी करण्यासाठी किटोसारख्या लोकप्रिय डाएटचे पालन करू नये. योग्य डाएट प्लानसाठी नेहमी पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

2. कमी शारीरिक क्रिया

जर तुम्ही कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यासाठी रोज अर्धा तास वॉक करत असेल तर कदाचित अर्धा तास तुमच्या शरीरासाठी पुरेसे नाही. कारण प्रत्येक शरीर वेगळे असते त्यामुळे तुमच्या शरीरानुसार वर्कआउट करणे गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या वर्कआउटचा वेळ (Time) वाढवणे महत्त्वाचे आहे.

Cholesterol
Cholesterol Control : शरीरातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरतात हे 4 पदार्थ

3. वारंवार मद्यपान करणे

मद्यपान करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे जर तुम्ही कोलेस्टेरॉल लेव्हल जास्त असल्यास मद्यपान करत असाल तर आणखी वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे मद्यपान करणे पूर्णपणे थांबवले नाही तर औषधे देखील काम करणार नाही.

4. तुम्हाला वाटते की औषधे घेणे पुरेसे आहे

कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही औषधे घेण्याचा सल्ला देतात परंतु केवळ औषध घेणे पुरेसे नाही. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला निरोगी जीवनशैली, व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित करावे लागेल त्यासोबतच नियमितपणे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे घ्यावे लागते.

Cholesterol
Cholesterol Side Effects : वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकते दूरदृष्टी कमकुवत, चूकनही 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका !

5. जास्त तणाव घेणे

कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त तणाव घेणे आरोग्यासाठी वाईट असू शकते. शरीरातील कोलेस्टेरॉल लेव्हल वाढल्याने लगेच जीवनासाठी धोका निर्माण होत नाही. म्हणून त्याबद्दल तणावग्रस्त होऊ नका अशा वेळेस स्वतःला शांत ठेवा आणि आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा. फक्त कोलेस्ट्रॉल वर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com