Early Signs of Hair Fall saam tv
लाईफस्टाईल

Hair Fall: शरीरात दिसणारे हे ४ संकेत सांगतात की केसांची गळती जास्त होणारे; वेळीच ओळखून उपाय करा

Early Signs of Hair Fall: केस गळणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे, पण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे केस गळत असल्यास, ते शरीरातील गंभीर अंतर्गत बदलांचे लक्षण असू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल १० पैकी ८ जणांना केसगळतीचा त्रास होतो. सध्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये केस गळणं ही एक सामान्य समस्या बनलीये. अगदी लहान तरूण वयातील मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजणांना केस गळण्याचा त्रास होतो. कदाचित तुम्हालाही हा त्रास होत असेल.

वैज्ञानिक संशोधनानुसार, केस गळण्यामागे एक नव्हे तर अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जसं की स्ट्रेस, चुकीचा आहार, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांचा अति वापर इत्यादी.

जसं एखाद्या आजाराचे शरीर आपल्याला संकेत देतं, त्याचप्रमाणे केस गळण्यापूर्वी देखील तुमचं शरीर तुम्हाला काही प्रमाणात संकेत देत असतं. तज्ज्ञांच्या मतानुसार, जर तुम्ही सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेतली तर टक्कल पडण्याचा धोका टाळता येतो.

डँड्रफ

जर तुमच्या टाळूवर पांढऱ्या रंगाची सुकलेली त्वचा म्हणजेच डँड्रफ दिसत असेल तर ही केस कमकुवत होण्याची पहिली खूण मानली दाते. डँड्रफ हे केसांच्या मुळांमध्ये अडकून त्यांना बंद करतो, ज्यामुळे नवीन केसांची वाढ थांबते. अशा वेळी अँटी-डँड्रफ शॅम्पूचा वापर करणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे.

टाळूवर सतत खाज येणं

जर तुम्हाला वारंवार टाळूवर खाज येत असेल तर ती स्कॅल्प इन्फेक्शन किंवा कोरडेपणाचं लक्षण असू शकतं. ही स्थिती केसांच्या मुळांना कमकुवत करू लागते. अशा वेळी सौम्य आणि सल्फेट-फ्री शॅम्पूचा वापर सुरू करा आणि टाळूला मॉइश्चराइज ठेवण्यावर भर द्या.

शॅम्पूनंतरही केस चिकट वाटणं

जर योग्य प्रमाणात शॅम्पू केल्यानंतरही केस चिकट वाटत असतील तर हे टाळूवर साचलेल्या तेल आणि घाणीचं लक्षण असतं. अशा स्थितीत केसांच्या मुळांना योग्य ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे केस गळती वाढते. यासाठी आठवड्यातून दोनदा क्लॅरिफायिंग शॅम्पू वापरा आणि केस कोमट पाण्याने धुवा.

सतत केस तुटणं

जर केस अत्यंत नाजूक वाटत असतील आणि थोडासा हात लावल्यावरही तुटत असतील, तसेच कंगवा करताना किंवा केस धुताना मोठ्या प्रमाणात केस गळत असतील, तर हे केस गळतीचं लक्षण आहे. ही स्थिती गंभीर होण्याआधीच उपाय करणं आवश्यक आहे.

उपाय काय?

  • केमिकलयुक्त किंवा स्ट्रॉन्ग शॅम्पूचा वापर थांबवा.

  • केसांसाठी चांगल्या दर्जाचं कंडिशनर वापरा.

  • आणि नारळ, बदाम यांसारखं नैसर्गिक तेल लावा.

  • आहारात आयर्न, प्रोटीन आणि बायोटिन यांसारखे पोषक घटक असलेले पदार्थ असू द्या.

  • जर वरील उपाय करूनही केस गळती थांबत नसेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाड पूर्व येथील रहेजा रियालिटीच्या बांधकाम प्रकल्पात कामगाराचा मृत्यू

Fat Loss Drink: रात्रीच्या जेवणानंतर 'हे' हर्बल ड्रिंक कमी करेल तुमचं वजन, एका आठवड्यात दिसायला लागेल फरक

रामटेकच्या मंदिरातील ‘नंदी’ सांगतो पाप-पुण्याचा हिशोब? जाणून घ्या कसा होते हा न्याय

राजकारणात खळबळ! महायुती-महाविकास आघाडीला धक्का, मुंडेंनी स्थापन केला नवा पक्ष|VIDEO

सख्खे भाऊ पक्के विरोधक! ऐन निवडणुकीत आमदाराच्या भावानं साथ सोडली, भाजपचं कमळ हाती घेणार

SCROLL FOR NEXT