ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिव्हर इन्फेक्शन ही एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये लिव्हर योग्यरित्या कार्य करणे थांबवते.
लिव्हर इन्फेक्शन हे हिपॅटायटीस इन्फेक्शन,फॅटी लिव्हर,फूड पॉईजनिंग, मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा, आणि काही औषधांच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो.
लिव्हर इन्फेक्शन झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.
जेव्हा लिव्हर योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात.यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.
लिव्हर इन्फेक्शन असल्यास बिलीरुबिन पिगमेंटची पातळी वाढते यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात.
लिव्हर इन्फेक्शनमुळे पोटात सूज येऊ शकते, ज्यामुळे पोटात वेदना होणे, भूक न लागणे, मळमळ, उलट्या आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
लिव्हर इन्फेक्शनमुळे, लिव्हर बिलीरुबिनची पातळी संतुलित करू शकत नाही, ज्यामुळे लघवीचा रंग अधिक पिवळा किंवा गडद होऊ शकतो.