ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते.
जेवणानंतर बडीशेप का खाल्ली जाते तसेच याचे फायदे कोणते जाणून घ्या.
बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि अन्न सहज पचते.
बडीशेप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.
यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत करते.
बडीशेप चावल्याने लाळ तयार होते जी चांगल्या पचनास मदत करते.
बडीशेप खाल्ल्याने पोट थंड राहते. तसेच जेवणाची चव संतुलित ठेवण्यास मदत करते.