ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलती जीवनशैलीमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका, कोरोनरी धमनी रोग, मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर कोणते लक्षणे दिसून येतात, जाणून घ्या.
शरीरात वाढलेल्या वाईट कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये चरबी जमा होते तेव्हा छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवू शकतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयावर दबाव येतो, ज्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्याने डोळ्यांभोवती आणि त्वचेवर पिवळे डाग येऊ शकतात.
वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे, शरीरातील रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे हात आणि पाय सुन्न होऊ शकतात.