Early symptoms of stroke saam tv
लाईफस्टाईल

Early symptoms of stroke: स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ३ मोठे बदल; मृत्यूचा धोका टाळण्यासाठी वेळीच ओळखा लक्षणं

Changes in body before a stroke: जेव्हा मेंदूच्या काही भागाला रक्तपुरवठा अचानक थांबतो किंवा रक्तवाहिनी फुटते, तेव्हा स्ट्रोक येतो. यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या मरू लागतात. स्ट्रोक येण्यापूर्वी काही विशिष्ट लक्षणे दिसू शकतात

Surabhi Jayashree Jagdish

  • स्ट्रोक अचानक आणि पूर्वसूचना न देता होऊ शकतो.

  • इस्केमिक स्ट्रोक सर्वात सामान्य प्रकार आहे.

  • हॅमरेजिक स्ट्रोकमध्ये मेंदूत रक्तस्त्राव होतो.

स्ट्रोक ही समस्या अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता होण्याचा अनेकदा धोका असतो. संपूर्ण जगभरात स्ट्रोकमुळे दरवर्षी कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडतात. याशिवाय काहींना कायमच्या अपंगत्वालाही सामोरं जावं लागतं.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दरवर्षी सुमारे १५ दशलक्ष लोक स्ट्रोकचा सामना करतात. यामध्ये ५ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात तर उरलेल्या ५ दशलक्ष लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व येतं. त्यामुळे स्ट्रोकची लक्षणं वेळेत ओळखणं म्हणजे मृत्यू आणि जीवन किंवा अपंगत्व यातला फरक ठरू शकतो.

स्ट्रोक म्हणजे काय?

स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये रक्तपुरवठा अचानक थांबणं किंवा मेंदूमध्ये अचानक रक्तस्त्राव होणं. स्ट्रोकचे दोन प्रमुख प्रकार असतात

  • इस्केमिक स्ट्रोक (Ischemic Stroke)

  • हॅमरेजिक स्ट्रोक (Hemorrhagic Stroke)

अधिक प्रमाणात दिसून येणारे स्ट्रोक हे इस्केमिक प्रकारातले असतात. यामध्ये मेंदूपर्यंत जाणारा रक्तपुरवठा थांबतो. परिणामी, मेंदूला ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. फक्त काही मिनिटांत मेंदूच्या पेशी मरू लागतात.

दुसरा प्रकार म्हणजे हॅमरेजिक स्ट्रोक. यामध्ये मेंदूतील एखाद्या रक्तवाहिनीमध्ये गळती होते किंवा ती फुटते. ज्यामुळे मेंदूच्या पेशींवर दाब येतो आणि त्या नष्ट होतात. कोणताही स्ट्रोक दीर्घकालीन मेंदूचं नुकसान, अपंगत्व किंवा मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो.

स्ट्रोकची प्रमुख लक्षणं कोणती?

चेहरा वाकडा होणं

स्ट्रोकचं सर्वात लवकर दिसणारं आणि स्पष्ट लक्षण म्हणजे चेहरा एकाच बाजूला वाकडं होणं. अनेकदा रुग्णाला स्वतः हे कळतही नाही, पण इतर लोकांना ते सहज दिसून येतं. याची तपासणी करण्यासाठी रुग्णाला हसण्यास सांगा. यावेळी जर चेहऱ्याचा एक भाग न हलता लटकल्यासारखा वाटत असेल, तर तो धोक्याचा इशारा आहे.

हातामध्ये अशक्तपणा किंवा बधीरपणा

शरीराच्या एका बाजूला अचानकपणे आलेला बधीरपणा किंवा अशक्तपणा हे स्ट्रोकचं आणखी एक प्रमुख लक्षण आहे. अमेरिकन स्ट्रोक असोसिएशनच्या मते, हे लक्षण अगदी अचानकपणे दिसून येतं. याची तपासणी करण्यासाठी दोन्ही हात वर करून बघा जर एक हात हळूहळू खाली झुकत असेल, तर ते स्ट्रोकचं लक्षण असू शकतं.

बोलण्यात अडथळा येणं

स्ट्रोकमुळे मेंदूची भाषा समजण्याची आणि बोलण्याची क्षमता बाधित होते. त्यामुळे रुग्णाचं बोलणं अस्पष्ट होतं. यावेळी रूग्ण चुकीचे शब्द वापरू शकतो. इतकंच नाही तर वाक्य पूर्ण करता येत नाहीत किंवा दुसऱ्यांचं बोलणं समजत नाही. हे लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांची मदत घेणं फायद्याचं आहे.

स्ट्रोक म्हणजे काय?

स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये रक्तपुरवठा अचानक थांबणे किंवा मेंदूत रक्तस्त्राव होणे, ज्यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या नष्ट होतात.

स्ट्रोकचे मुख्य प्रकार कोणते?

स्ट्रोकचे दोन मुख्य प्रकार म्हणजे इस्केमिक स्ट्रोक (रक्तपुरवठा थांबणे) आणि हॅमरेजिक स्ट्रोक (मेंदूत रक्तस्त्राव होणे).

चेहरा वाकडा होणे हे का धोक्याचे लक्षण आहे?

चेहरा एका बाजूला वाकडा होणे म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याचे संकेत असतात. रुग्णाला हसताना एक बाजू लटकते तर ते स्ट्रोकचे लक्षण आहे.

हातातील अशक्तपणा स्ट्रोकचे लक्षण कसे ओळखावे?

रुग्णाला दोन्ही हात वर करण्यास सांगा. जर एक हात हळूहळू खाली येत असेल किंवा त्यात बलहीनता जाणवत असेल, तर ते स्ट्रोकचे लक्षण आहे.

बोलण्यात अडथळा येणे स्ट्रोकचे लक्षण कसे आहे?

स्ट्रोकमुळे मेंदूची भाषा समजण्याची आणि बोलण्याची क्षमता कमी होते. रुग्ण अस्पष्ट बोलतो, शब्द चुकीचे वापरतो किंवा वाक्य पूर्ण करू शकत नाही, जे धोक्याचे स्पष्ट संकेत आहेत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एक मंडळ एक ढोल पथक करा, गणेश मंडळांची पोलिसांना विनंती

Satyapal Malik: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन

LAVA ProBuds N21: लावाचा ProBuds N21 नेकबँड लॉन्च, १० मिनिटांत १० तास प्लेबॅक

Solapur Umesh Patil : आमदार नसूनही गाडीवर ‘आमदार’ लोगो; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा 'कार'नामा

कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव, महिलेला लोखंडी रॉडनं काळंनिळं होईपर्यंत मारलं; गळाही आवळला

SCROLL FOR NEXT