Long Hair Care Tips Saam tv
लाईफस्टाईल

Long Hair Care Tips: कंबरेपर्यंत लांब-घनदाट केस हवेत? स्वयंपाकघरातील हे ३ पदार्थ संजीवनी, महिन्याभरात केस वाढतीलच!

Home Remedies For Long Hair : केसांची वाढ का खुंटते, त्याला फाटे का फुटतात असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील तर या गोष्टींची काळजी घ्या.

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : आजकाल प्रत्येक तरुणीला स्वत:चे केस लांब-घनदाट हवे असतात. पाहायला गेले तर हा एक ट्रेंडच सुरु झाला आहे. काही लोक केस वाढवण्यासाठी औषधोपचार घेतात. तर काही महागड्या उत्पादनांचा वापर करतात.

केस वाढवण्यासाठी अनेकजण व्हिडीओचा देखील वापर करतात. कितीही पैसे खर्च केले तरीही केस काही वाढत नाही. केसांची वाढ का खुंटते, त्याला फाटे का फुटतात असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. परंतु, आपल्या स्वयंपाकघरात असे काही पदार्थ आहे. ज्याचा वापर करुन केस लांबसडक करु शकतो व त्याचा पोत देखील सुधारु शकतो. जाणून घेऊया स्वयंपाकघरातील प्रभावी उपायांबद्दल

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

1. अंडी (Egg)

अंड्यामध्ये प्रथिने असतात जे केसांच्या वाढीना पोषण देतात. त्यांना अधिक जाड व सुंदर बनवण्यासाठी यांचा फायदा होतो. केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून एकदा अंड्याचा हेअर मास्क लावता येते. अंड्याचा मास्क बनवण्यासाठी अंड्याच्या ब्लकमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल व मध मिसळा. हा हेअर मास्क (Hair Mask) केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा आणि १५ ते २० मिनिटे ठेवल्यानंतर केस धुवा. एग हेअर मास्क केसांना जीवनसत्त्वे आणि झिंक, लोह आणि सेलेनियम देतो.

2. मेथी

स्वयंपाकघरातील (Home remedies) सगळ्यात रामबाण मेथीचे दाणे. केसांना मेथी लावण्यासाठी २ चमचे मेथी पाण्यात भिजवा. रात्रभर भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी याची पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट केसांवर २० मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा. केसगळतीची समस्या थांबेल.

3. कांद्याचा रस

लांब केसांसाठी कांद्याचा रस हा फायदेशीर ठरतो. त्यासाठी कांदा किसून पिळून घ्या. कापसाच्या मदतीने किंवा बोटांने टाळूवर लावा. हा रस १० ते १५ मिनिटे लावल्यानंतर आपले केस धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT