White Hair Problem: केमिकल डायला करा बाय बाय! मेहंदीमध्ये मिसळा हा पदार्थ, पांढरे केस होतील काळेभोर-लांबसडक

Home Remedies For White Hair: अकाली केस पांढरे होण्याने आपण वैतागले असाल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
White Hair Problem
White Hair ProblemSaam TV
Published On

Dye For White Hair : केस पांढरे होणे, सतत गळणे, कोंडा व इतर अनेक समस्यांवर उपाय करुनच पाहिले असतील. कधी महागडे केमिकल्स तर कधी घरगुती उपाय पण यातून कोणताही फायदा आपल्याला झालेला नाही. अकाली केस पांढरे होण्याने आपण वैतागले असाल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.

वाढत्या वयानुसार केस पांढरे होत जातात. केस काळे करण्यासाठी आपण महागड्या डायचा वापर करतो. ज्यामुळे केसांना नुकसान होते. रासायनिक रंगांमुळे केस मुळापासून टोकापर्यंत कोरडे होतात आणि त्यांचा परिणाम आपल्या टाळूवर होतो. बरेचदा केस काळे होण्याऐवजी लाल होतात. त्यामुळे केसांना कोणती मेहंदी लावायची? केस काळे करण्यासाठी कोणता डाय चांगला आहे हे पाहूया

White Hair Problem
Diabetes Hair Falls : जालीम उपाय करुन पाहाच! केस गळून खूप विरळ-पातळ झाले आहेत? असू शकते मधुमेहाचा आजार

1. पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी

  • एका मोठ्या भांड्यात 4 ते 5 चमचे मेहंदी पावडर मिसळा. त्यात २ चमचे ब्लॅक टी (Black Tea) घाला.

  • आता पेस्ट बनवण्यासाठी पाणी मिसळा आणि या तयार पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.

  • मेहंदीमध्ये काळ्या चहाचे मिश्रण करण्याऐवजी तुम्ही ते उकळून त्यात मेहंदी विरघळवून घेऊ शकता.

  • अशा प्रकारे विरघळलेल्या मेहंदीचा रंग केसांवर (Hair) अधिक मजबूत होतो.

  • मेहंदीची पेस्ट तयार झाल्यानंतर, किमान 8 तास बाजूला ठेवा. किंवा रात्रभर बाजूलाही ठेवू शकता.

White Hair Problem
Best Place In Konkan : निसर्ग सौंदर्याने बहरला कोकण, पावसाळ्यात ही १० ठिकाणं प्रेमात पाडतीलच!
  • दुसऱ्या दिवशी केसांना मेहंदी लावा. ही मेहंदी पांढऱ्या केसांवर अर्धा तास ते तासभर ठेवल्यानंतर डोके धुवा.

  • मेहंदीचा जाड गडद रंग केसांवर चढेल. केस धुताना शॅम्पू (Shampoo) वापरू नका. दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू लावा.

  • मेहंदी लावली त्याच दिवशी शॅम्पू केल्याने केसांवरील मेहंदीचा रंग निघून जातो. पांढऱ्या केसांवर महिन्यातून दोनदा मेहंदी लावू शकता.

  • भृंगराज आणि आवळा मिसळून मेहंदी लावल्यास केसांना एक नाही तर अनेक फायदे होतात.

  • हे टाळूची पीएच पातळी संतुलित करते, तेल उत्पादन नियंत्रित करते आणि केसांचा कोरडेपणा देखील दूर करते. केसगळती टाळण्यासाठी मेहंदी देखील लावता येते. हे केसांना मऊ आणि रेशमी बनवते आणि कोंडासारख्या समस्या दूर ठेवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com