Diabetes Hair Falls : जालीम उपाय करुन पाहाच! केस गळून खूप विरळ-पातळ झाले आहेत? असू शकते मधुमेहाचा आजार

Can Hair Loss Be a Symptom of Diabetes : केस गळतीच्या समस्येवर आपण अनेक जालीम उपाय करुन पाहिले असतील तरी देखील केसगळती काही थांबत नाही.
Diabetes Hair Falls
Diabetes Hair FallsSaam tv
Published On

Hair Falls Problem : केसगळती आणि मधूमेह हा आजार भारतात मोठ्या प्रमाणात वाढ आहे. सध्या ही परिस्थिती प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येत आहे. मधुमेहामुळे आरोग्याच्या विविध परिस्थिती उद्भवू शकतात?

केस गळतीच्या समस्येवर आपण अनेक जालीम उपाय करुन पाहिले असतील तरी देखील केसगळती काही थांबत नाही. परंतु, तुम्हाला माहित आहे का? केसगळतीचे एक कारण मधुमेहाचा आजार असू शकतो. त्याला सर्वात सामान्य म्हणजे अलोपेसिया एरियाटा. अलोपेसिया अरेटा हा एक स्वयंप्रतिकार विकार आहे ज्यामुळे टाळूसह शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केस गळतात.

Diabetes Hair Falls
Hair Falls Problem: झरझर वाढतीलच! केस प्रमाणापेक्षा जास्त गळताय? फुलांपासून बनवा आयुर्वेदिक होममेड तेल, लगेच मिळेल रिजल्ट

मधुमेहाचा (Diabetes) त्रास असलेल्या लोकांमध्ये तणावाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते, ज्यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढू शकते. कोर्टिसोल हा असाच एक हार्मोन आहे ज्यामुळे केस गळतात. आज आम्ही मधुमेहामुळे केस गळणे (Hair Falls) कसे थांबवायचे ते सांगत आहोत.

मधुमेहामुळे केस गळणे कमी करण्याचे उपाय

1. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा

उच्च रक्तातील साखरेची (Sugar) पातळी अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते, जसे की मज्जातंतूचे नुकसान, मूत्रपिंड समस्या आणि केस गळणे.

Diabetes Hair Falls
Don't Eat Wheat For A Month : महिनाभर गव्हाचे पदार्थ खाऊच नका, शरीरात होतील हे बदल

2. सकस आणि संतुलित आहार घ्या

निरोगी आणि संतुलित आहार कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्या आहारात फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त प्रथिनयुक्त पदार्थ समाविष्ट करू शकता. संतुलित आहार घेतल्यास केसगळती कमी होण्यास मदत होते.

3. हायड्रेटेड रहा

दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरासह तुमची टाळू हायड्रेट राहते, ज्यामुळे केस गळणे कमी होऊ शकते.

Diabetes Hair Falls
Stress And Teenagers : धक्कादायक वास्तव समोर, १० पैकी ७ तरुण तणावग्रस्त; का उचलताहेत टोकाचं पाऊल? कारणं समोर

4. नियमित व्यायाम करा

शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते आणि तणाव कमी होतो, ज्याचा तुमच्या केसांवर थेट सकारात्मक परिणाम होतो.

5. तणाव कमी करा

तणावामुळे संप्रेरकांच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे केस गळतात. ध्यान आणि योगासने करून तणाव कमी करता येतो.

6. आपले केस खराब होण्यापासून वाचवा

केसांवर सौम्य शैम्पू आणि कंडिशनर वापरा. तसेच, घट्ट केशरचना टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com