how to weight loss when you are over forty, weight loss tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

चाळिशी ओलांडताना शरीराचे ओझे नसावे !

बहुतेक महिला एका वयानंतर वजन वाढण्याच्या त्रासाचा सामना करीत असतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर अनेक प्रकारचे आजार उद्भवू लागतात. (Weight loss tips in Marathi)

हे देखील पहा-

बहुतेक महिला एका वयानंतर वजन वाढण्याच्या त्रासाचा सामना करीत असतात, पण त्यासोबतच वजन वाढण्याच्या समस्येकडे लक्षही देत नाहीत. यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या त्रासातून जावे लागते. चाळीशीनंतर आपल्या खाण्यापिण्यात बदल करायला हवे नाहीतर पाय दुखणे, सांध्यांच्या समस्या, हृदयाचे रोग, मधुमेह इत्यादी समस्या सुरु होतात. वजन कसे नियंत्रित करू शकता याविषयी जाणून घेऊया.

१. खूप गोड खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक होऊ शकते व तब्बेतीला याची किंमत मोजावी लागते. चाळीशीनंतर आपल्या खाण्यात खूप जास्त साखर व त्याचे घटक असतील तर आपले वजन वेगाने वाढते.

२. वयासोबत जबाबदाऱ्या वाढतात व त्यासोबत ताणदेखील वाढतो. मुलांचा अभ्यास, नोकरी, धावपळ करणे या सर्वांत स्वतःची देखभाल आपण विसरतो. त्यामुळे आपले वजन वाढू शकते.

३. एंझाइम आपल्या शरीरात प्रोटीन आणि फॅट पचवण्यास मदत करते. याच्या कमी जास्त होण्यामुळे शरीरात अस्थिरता निर्माण होते. यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.

४. वजन हे संबंधित व्यक्तीच्या उंचीवर अवलंबून असते. चाळीशीनंतर वजन ५५ ते ६० किलोग्रॅमदरम्यान असायला हवे.

५. आपण सतत आजारी असू किंवा जास्त व्यायाम करता येत नसेल तर आपण नियमित तासभर तरी चालायला हवे. सकाळी चालणे सर्वांसाठी फायदेशीर असते.

६.वजन कमी (Weight loss) करण्यासाठी कार्डियोवर जोर दिला जातो. कार्डियो एक्सरसाइजमध्ये एरोबिक्स, जॉगिंग, झुंबा, योग वा सूर्यनमस्कारही करू शकतो. कसे असावे खाणे-पिणे, केळी, बीट, डार्क चॉकलेट, किंवी, कलिंगड, ताज्या भाज्या ब्लडप्रेशर कमी करण्यास मदत करतात.

७. नाश्त्यात दलिया, ओट्स, दही, काळे फुटाणे, उकडलेले अंडे खाऊ शकता. नाश्ता सकाळी ९ वाजेपर्यंत करायला हवा. दुपारी डाळी, ताज्या भाज्या (Vegetable), सॅलड, अंडी, बीन्स खावे. दुपारचे जेवण दुपारी २ पर्यंत करावे. रात्रीचे जेवण ८ ते ९ दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा. खाण्यात कार्बोहायड्रेट्स कमी घ्यावेत व प्रोटीन जास्त घ्यावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT