Panchang today horoscope SAAM TV
लाईफस्टाईल

Panchang Today: प्रजासत्ताक दिनी पंचांगाचा प्रभाव; २६ जानेवारीला कोणत्या राशींना मिळणार लाभ?

Republic Day almanac zodiac signs: २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी पंचांगानुसार काही राशींना विशेष लाभ होणार आहे. या दिवशी ग्रहस्थिती अनुकूल असल्यामुळे आर्थिक, करिअर आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील.

Surabhi Jayashree Jagdish

आज २६ जानेवारी २०२६ सोमवारचा दिवस असून शिशिर ऋतूतील हा दिवस उत्साह, नव्या सुरुवाती आणि कृतीशील निर्णयांना प्रोत्साहन देणारा मानला जातो. शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी, अश्विनी नक्षत्र आणि साध्य योगाचा प्रभाव आज सकाळपर्यंत राहणार आहे. त्याचप्रमाणे चंद्र मेष राशीत असल्यामुळे आत्मविश्वास, धाडस आणि पुढाकार घेण्याची वृत्ती वाढलेली दिसेल. आजचं पंचांग, शुभ-अशुभ मुहूर्त काय आहेत ते पाहूयात.

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल अष्टमी

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • वार: सोमवार

  • नक्षत्र: अश्विनी

  • योग: साध्य (सकाळी 09:12:00 पर्यंत)

  • करण: विष्टि

  • चंद्र राशि: मेष

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 07:09:36 AM

  • सूर्यास्त: 06:10:32 PM

  • चंद्रोदय: 11:46:38 AM

  • चंद्रास्त: 12:21:14 AM (पुढील दिवस)

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): माघ

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त:

12:18:00 PM ते 01:02:00 PM

आजचे अशुभ मुहूर्त

राहु काल: 08:32:13 AM ते 09:54:50 AM

यमघंट काल: 11:17:27 AM ते 12:40:04 PM

गुलिकाल: 02:02:41 PM ते 03:25:18 PM

आजचा दिवस कोणत्या चार राशींसाठी ठरणार लकी?

मेष रास

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि ऊर्जा उच्च पातळीवर राहणार आहे. नवीन कामं सुरू करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

सिंह रास

कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी लक्षवेधी ठरणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक किंवा जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहे.

धनु रास

या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकणार आहे. शिक्षण, प्रवास, स्पर्धा किंवा नवीन संधींबाबत सकारात्मक घडामोडी होऊ शकतात.

मिथुन रास

बौद्धिक कामं, संवाद आणि चर्चांसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाच्या भेटी किंवा संभाषणातून फायदा होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT