Warning signs before a heart attack saam tv
लाईफस्टाईल

Heart Failure: हार्ट फेल्युअरपूर्वी शरीर देत असतं हे संकेत; सामान्य समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात

Body signals before heart failure: हृदय निकामी होणं ही एक गंभीर वैद्यकीय परिस्थिती मानली जाते. यामध्ये हृदय निकामी होते तेव्हा ते शरीराला आवश्यक असलेले रक्त प्रभावीपणे पंप करू शकत नाही.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयाच्या कोणत्याही समस्या होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही ना काही संकेत देत असतं. पण बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. हे संकेत म्हणजे सामान्य थकवा, वय वाढल्याचे परिणाम किंवा दैनंदिन ताणतणाव. मात्र, हे संकेत दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकते. हृदयविकाराचं उशिरा निदान झाल्यास झालेलं नुकसान परत सुधारता येत नाही. म्हणूनच हार्ट फेल्युअरची लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हार्ट फेल्युअर होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकते देत असतं. ही लक्षणं नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया.

श्वास घेण्यास त्रास होणं

जर तुम्हाला जिने चढताना, चालताना किंवा अगदी विश्रांती घेतानाही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयाशी संबंधित समस्या असू शकतं. अनेक लोक हवामान, प्रदूषण किंवा शरीराच्या फिटनेसवर दोष देतात. पण हृदयविकारामुळे हृदय शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवू शकत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

पाय, घोटे किंवा पायांमध्ये सूज

बर्‍याच लोकांना जास्त वेळ उभं राहिल्याने किंवा प्रवासामुळे पायांमध्ये सूज येऊ शकते. पण हार्ट फेल्युअर होण्यापूर्वी हृदय इतकं कमजोर होतं की ते रक्त पंप करू शकत नाही, आणि त्यामुळे शरीराच्या खालच्या भागात द्रव साचतो. पाय जड वाटू शकतो.

थोड्या कामानंतरही थकवा

आपण सर्वजण कधी ना कधी थकतो. पण कारण नसताना होणारा थकवा चिंताजनक असू शकतो. हृदय कमजोर झाल्यास मेंदू आणि स्नायूंना कमी रक्तपुरवठा होतो आणि थकवा जाणवतो. पण हृदयाशी संबंधित थकवा हा झोप किंवा विश्रांती घेतल्यानंतरही राहतो.

छातीत वेदना होणं

छातीत वेदना नेहमीच हृदयविकार असतो, पण वारंवार होणाऱ्या अस्पष्ट वेदना दुर्लक्षित केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेकांना छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दाब, वेदना किंवा वजन जाणवतं. कधी कधी हे सौम्य अपचनासारखे वाटतं, पण प्रत्यक्षात हृदय संघर्ष करत असल्याचे संकेत असू शकतात.

सतत खोकला

सतत कोरडा खोकला किंवा रात्री श्वास घेताना घरघर होणं असा त्रस होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी हृदय रक्त पंप करू शकत नसल्याने फुफ्फुसात द्रव साचतो. जर झोपल्यावर खोकला वाढतो किंवा श्वास घेणं कठीण होतं.

अचानक वजन वाढणं

जर काही दिवसांत 2-3 किलो वजन वाढलं आणि आहारात बदल नसेल, तर ते द्रव साचल्यामुळे असू शकते. हृदय अतिरिक्त द्रव बाहेर टाकू शकत नसल्याने शरीरात द्रव साचतो. त्यामुळे शरीर जड वाटते किंवा फुगल्यासारखे वाटतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways:रेल्वेत दारू नेता येते का? जर दारूची बाटली सापडली तर काय होते शिक्षा, काय आहेत नियम?

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो; ३५ KM अंतर २०स्टेशन,६ भूमिगत स्थानके; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मेट्रोलाइन ८चा आराखडा

Maharashtra Live News Update:दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण चौधरी कुटुंबीयांसह मगर कुटुंबीयांवर सुद्धा गुन्हा दाखल

Face Care: फेसवॉशऐवजी 'या' घरगुती सामग्रीने चेहरा धुतला तर मिळेल नॅचरली ग्लोईंग आणि स्मूद फेस

Kia India 2026: लोकांच्या पसंतीस उतरलेली New Kia Seltos कारमध्ये मोठे बदल, जाणून घ्या नवे फिचर्स

SCROLL FOR NEXT